मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या गुरुवारी सादर करण्यात आलेल्या १२ हजार १५७ कोटींच्या अर्थसंकल्पात मुंबई महानगर प्रदेशातील विविध प्रकल्पांसाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. मुंबई पारबंदर म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, पाणीपुरवठा योजनांसाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील तरतुदींसह मुंबई नागरी परिवहन प्रकल्पावरही प्राधिकरणाने अधिक जोर दिला आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो प्रकल्पांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले असून, एकूण सात मेट्रो प्रकल्पांसाठी ४ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुंबई पारबंदर प्रकल्पाकरिता करण्यात आलेल्या २ हजार १०० कोटींच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे या प्रकल्पास चालना मिळेल, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी थेट मार्ग उपलब्ध होणार आहे. शिवाय पुणे एक्स्प्रेस वे आणि पुढे दक्षिण भारताकडे जाण्याकरिता प्रकल्प उपयोगी ठरणार आहे. जलस्रोत विकासाकरिता ५८१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ४०३ एलएलडी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात करण्यात आली असून, याद्वारे मीरा-भार्इंदर व वसई-विरार महापालिका, काही भाडेतत्त्वावरील घरे योजना, महानगर प्रदेशातील पश्चिम उपप्रादेशिक नगरातील गावांसाठी मुबलक पाणीपुरवठा करता येणार आहे. सूर्या धरणातून पाणी घेत त्यावर सूर्यानगर येथे प्रक्रिया करण्यात येईल. त्यानंतर ८८ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. या प्रकल्पाची किंमत अंदाजे १ हजार ६११ कोटी असून, या प्रकल्पाच्या कामास नुकतीच सुरुवात केली आहे.मुंबई महानगर प्रदेश आणि रस्त्याचे जाळे विकसित करण्यासाठी १ हजार २९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या प्रदेशाला मुंबई शहर आणि आसपासच्या परिसराबरोबर जोडण्याकरिता उत्तम जोडणी उपलब्ध करून देण्याकरिता फ्लायओव्हर, खाडी पूल आणि रस्त्यांचे जाळे यांच्या विकासाकरिता लक्षणीय तरतूद केली आहे.अर्थसंकल्पावर दृष्टिक्षेपदहिसर ते डी.एन. नगर या मेट्रो-२ अ साठी १ हजार ५८८ कोटीअंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो-७ साठी १ हजार २६२ कोटीडी.एन. नगर ते मंडाला मेट्रो-२ ब साठी ७०० कोटीकुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ साठी ५०० कोटीवडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ साठी ४५० कोटीठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-५ साठी १०० कोटीस्वामी समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-विक्रोळी या मेट्रो-६ साठी प्रत्येकी १०० कोटीमुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प ६१ कोटीमुंबई महानगर प्रदेशाच्या बाह्य क्षेत्रातील रस्ते सुधारणा ५० कोटीवांद्रे-कुर्ला संकुलात सुधारणा आणि नागरी सुविधा ८२.६५ कोटीमिठी नदी विकास २० कोटीसांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचे कुर्ला ते वाकोला पुलापर्यंत विस्तारीकरण आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उन्नत मार्ग १८० कोटीपूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर येथील उन्नत मार्ग सुधारणा ७० कोटीपूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल व दुरुस्ती १२६ कोटीइतर संकीर्ण प्रकल्पावरील खर्च ७५९.८५ कोटीएकूण कर्जे १३१.५५ कोटीअनुदाने २९९.२५ कोटीइतर खर्च ६७५.५० कोटीप्रकल्पाच्या जागेवर कामगारांना नियुक्त करताना सुरक्षित उपाययोजना कंत्राटदारांना पुरवावी तसेच कोणत्याही दुर्घटनेत बळी पडलेल्या कामगाराला आणि त्याच्या परिवाराला नुकसानभरपाई मिळावी म्हणून कामगार कल्याण निधीसाठी प्रयत्न सुरू आहे. पीडित कामगार आणि त्यांच्या परिवाराला नुकसानभरपाई मिळावी म्हणून प्राधिकरणाकडून लवकरच या धोरणाचे प्रारूप तयार करण्यात येणार आहे.- यू.पी.एस. मदान, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
मेट्रोला मिळाले एमएमआरडीएचे ‘बुस्ट’, अर्थसंकल्प सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 3:10 AM