लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये सोमवारपासून आणखी वाढ केली जाईल. प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुंबई मेट्रो वनने स्पष्ट केले. सध्या मेट्रोच्या फेऱ्यांची संख्या सुमारे २०० असून, साेमवारपासून हा आकडा २३० होण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो वनने लॉकडाऊन शिथिल होत असतानाच मेट्रो ऑक्टोबर महिन्यात सुरू केली. आता मेट्रो प्रवाशांचा आकडा ७० हजारांच्या आसपास गेला आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद, प्वाढती संख्या पाहता मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शिवाय स्थानकांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून प्रवेशद्वारांची संख्या वाढविली जाईल.
१८ जानेवारीपासून मेट्रो सेवेचे तासही वाढविले जातील. त्यानुसार, आता वर्सोवा येथून पहिली मेट्रो सकाळी ७.५० वाजता धावेल, तर घाटकोपर येथून सकाळी ८.१५ वाजता धावेल. घाटकोपर येथून शेवटची मेट्रो १०.१५ वाजता धावेल, तर वर्सोवा येथून ९.५० वाजता धावेल. आता ही वेळ सकाळी ८.३० ते रात्री ८.३० आहे.
............................