Join us

मेट्रोची सुपर कनेक्टिव्हिटी

By admin | Published: October 10, 2016 3:59 AM

मुंबईमधील दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम, विस्तारित आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे

मुंबई : मुंबईमधील दळणवळणाची सुविधा अधिक सक्षम, विस्तारित आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे महानगरामध्ये मेट्रोचे जाळे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. याद्वारे मुंबईचे सर्व मार्ग एकमेकांशी कनेक्ट करण्यात येणार आहेत. यामध्ये मेट्रो-२ अ, मेट्रो-२ ब, मेट्रो-३, मेट्रो-४ आणि मेट्रो-७ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मेट्रो रेल्वेची लोकलसह मोनोरेलसोबतही नाळ जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याने भविष्यात मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट होईल.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच या प्रकल्पांना गती देण्यासाठी मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ या दोन मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. डी.एन. नगर-वांद्रे-मानखुर्द, मेट्रो-२ ब मध्ये २२ स्थानके आहेत. वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली, मेट्रो-४मध्ये ३२ स्थानके आहेत. या दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी प्राधिकरणाकडील स्वत:चा निधी आणि आंतरराष्ट्रीय, आंतरदेशीय किंवा इतरद्विपक्षीय, बहुपक्षीय वित्तीय संस्थेकडून कर्ज साहाय्यानुसार करण्यात येणार आहे. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनी प्राधिकरणाकडे नाममात्र दराने भाडेतत्त्वावर हस्तांतरित करण्यास मान्यता दिली. प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्प पुनर्वसन व पुनर्वसाहत धोरणनुसार करण्याकरिता मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)मेट्रोच्या डी.एन. नगर-वांद्रे-मानखुर्द, मेट्रो-२ ब मध्ये २२ स्थानके आहेत. वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो-४ मध्ये ३२ स्थानके आहेत. मेट्रोच्या जाळ््याच्या माध्यमातून मुंबईचे वेगवेगळे भाग जोडले जाणार आहेत. दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व, मेट्रो-७वरील स्थानकेअंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, मानखुर्द, आरे, पठाणवाडी, पुष्पा पार्क, बाणडोंगरी, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा, मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओवरीपाडा आणि दहिसर पूर्व.च्डी.एन. नगर-वांद्रे-मानखुर्द, मेट्रो-२ ब ची कनेक्टीव्हिटी (इंटरचेंज)च्डी.एन. नगर (मेट्रो मार्ग १)च्वांद्रे (उपनगर)च्आयटीओ जंक्शन (मेट्रो मार्ग ३)च्कुर्ला पूर्व (उपनगर आणि मेट्रो मार्ग ४)च्चेंबूर (मोनोरेल)च्मानखुर्द (उपनगर, सीएसटी-पनवेल फास्ट कॉरिडोर, मुंबई-नवी मुंबई एअरपोर्ट फास्ट कॉरिडोर)च्वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली, मेट्रो-४ची कनेक्टीव्हिटी (इंटरचेंज)च्वडाळा (मोनोरेल)च्कुर्ला (मेट्रो मार्ग २ ब)च्कापूरबावडी (मेट्रो मार्ग ४)डी.एन. नगर-वांद्रे-मानखुर्द, मेट्रो-२ ब वरील स्थानकेडी.एन. नगर, एसिकनगर, प्रेमनगर, इंदिरानगर, नानावटी रुग्णालय, खिरानगर, सारस्वतनगर, नॅशनल कॉलेज, वांद्रे मेट्रो, एमएमआरडीए कार्यालय, आयकर कार्यालय, आय.एल. अ‍ॅण्ड एफ.एस., एम.टी.एन.एल. मेट्रो, एस.जी. बर्वे मार्ग, कुर्ला टर्मिनस, कुर्ला पूर्व, पूर्व द्रुतगती महामार्ग, चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बी.एस.एन.एल. मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले मेट्रो कारशेड.कुलाबा-वांद्रे-सीप्झ, मेट्रो-३वरील स्थानकेकफ परेड, विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रँटरोड, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, मेट्रो स्टेशन, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक व वरळी सिद्धिविनायक, दादर, मेट्रो व शीतलादेवी, धारावी, बीकेसी मेट्रो, विद्यानगरी, सांताक्रुझ, सीएसआयए, सहार रोड, सीएसए-आंतरराष्ट्रीय, मरोळनाका, एमआयडीसी, सीप्झ.च्वडाळा डेपो, भक्ती पार्क, मेट्रो आणिकनगर बस डेपो, सुमननगर, सिद्धार्थ कॉलनी, अमर महल जंक्शन, गरोडीयानगर, पंतनगर, लक्ष्मीनगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो, सूर्यानगर, गांधीनगर, नवल हाउसिंग, भांडुप मेट्रो, शांग्रीला सोनापूर, मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका, तीनहात नाका (ठाणे), आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजिनी वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली.