Join us

ओव्हरहेड वायरवर पक्षी धडकल्याने मेट्रोची वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 6:02 AM

घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या ट्रॅकवर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ओव्हरहेड वायरला पक्षी धडकल्याने मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वाहतूक विस्कळीत झाली.

मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या ट्रॅकवर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ओव्हरहेड वायरला पक्षी धडकल्याने मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर तांत्रिक बिघाड दूर करून ५ वाजेपर्यंत ही सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र, जवळपास दोन तास मेट्रो सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर ते जागृतीनगर स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरला पक्ष्याने जोरदार धडक दिली. परिणामी, घाटकोपर आणि जागृतीनगर स्थानकांदरम्यान धावणाºया मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे सुरुवातीला घाटकोपर ते वर्सोवादरम्यानची वाहतूक तत्काळ थांबविण्यात आली. त्यानंतर खबरदारी म्हणून वर्सोवा ते घाटकोपर ही सेवाही पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने ओव्हरहेड वायरला चिकटलेल्या पक्ष्याला दूर करून तांत्रिक बिघाड दुरुस्त केला.दरम्यान, या बिघाडामुळे घाटकोपर आणि जागृतीनगर स्थानकांदरम्यान अडकलेल्या मेट्रोला डेपोत पाठवून तिची दुरुस्ती करण्यात आली. शनिवारी अनेकांना अर्धा दिवस काम असल्याने लवकर घरी निघालेल्या मुंंबईकरांची मेट्रो बिघाडामुळे गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :मेट्रो