मेट्रो ट्रेनचे टेस्टिंग जोरात; आज नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

By मनोहर कुंभेजकर | Published: January 19, 2023 11:39 AM2023-01-19T11:39:16+5:302023-01-19T11:39:45+5:30

गुंदवली ते अंधेरी पश्चिम या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यावर पश्चिम दुर्तगती महामार्ग आणि लिंक रोड येथील वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे

Metro train testing in full swing; Inauguration will be held by PM Narendra Modi today | मेट्रो ट्रेनचे टेस्टिंग जोरात; आज नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

मेट्रो ट्रेनचे टेस्टिंग जोरात; आज नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

googlenewsNext

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सायंकाळी अंधेरी पश्चिम दुर्तगती महामार्गावर गुंदवली येथे पूर्णक्षमतेने चालणाऱ्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण होणार आहे. मात्र पूर्वेला गुंदवली पर्यंत आणि पश्चिमेला अंधेरी पश्चिम पर्यंत गेल्या दि, ८ पासून या मार्गावर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ यांचे टेस्टिंग जोरात सुरू आहे.

दि,२० रोजी गुंदवली ते अंधेरी पश्चिम या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यावर पश्चिम दुर्तगती महामार्ग आणि लिंक रोड येथील वाहतूक कोंडी कमी होईल असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. मात्र पश्चिम दुर्तगती महामार्ग आणि लिंक रोड येथील प्रत्यक्षात जमिनीवरील वाहतूक कोंडी कमी होणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. सध्या आरे ते डहाणूकर वाडी आणि डहाणूकर ते आरे या मार्गावर प्रवाश्यांना घेवून जरी मेट्रो धावत असली तरी,डहाणूकर वाडी ते अंधेरी पश्चिम आणि आरे ते गुंदवली अशी मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ ची टेस्टिंग सुरू आहे.

आज सदर टेस्टिंग कशी सुरू आहे याची आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता,मेट्रो ट्रेनच्या दर्शनीय चालकाच्या केबिनवर आणि स्टेशनच्या इंडिकेटरवर अंधेरी पश्चिम आणि गुंदवली असे लिहिले होते.तसेच प्रत्येक मेट्रो स्टेशनवर ही गाडी अंधेरी पश्चिम स्टेशन पर्यंत/ गुंदवली पर्यंत जाणार आहे अशी मराठी, हिंदी व इंग्रजीत घोषणा होते.

डहाणूकर वाडीला मेट्रोची समाप्ती झाल्यानंतर प्रवासी डब्यात नाही याची खात्री करून मेट्रो पुढे अंधेरी पश्चिम पर्यंत जाते,आणि परत अंधेरी पश्चिम ते होते.डहाणूकर वाडी पर्यंत प्रवासी विरहित आणि पुढे मग होते. डहाणूकर वाडी ते आरे पर्यंत प्रवासी घेवून जाते,मग आरे ते गुंदवली असा प्रवासी विरहित असे मेट्रोचे टेस्टिंग जोरात सुरू आहे.

मार्ग: २अ

स्थानक: दहिसर पूर्व, अप्पर दहिसर स्टेशन (आनंद नगर), कंदरपाडा (रुषी संकुल), मंडपेश्वर (आयसी कॉलनी), एकसर, बोरिवली पश्चिम (डॉन बॉस्को), पहारी एकसर (शिंपोली, नंतर शिंपावली), कांदिवली पश्चिम (महावीर नगर), डहाणूकरवाडी (कामराज नगर), वलनई (चारकोप), मालाड पश्चिम, लोअर मालाड (कस्तुरी पार्क), पहारी गोरेगाव (बांगूर नगर), गोरेगाव पश्चिम, ओशिवरा (आदर्श नगर), लोअर ओशिवरा (शास्त्री नगर) आणि अंधेरी पश्चिम (डीएन) नगर)

मार्ग: मेट्रो ७

स्थानक: दहिसर पूर्व, ओवारीपारा, राष्ट्रीय उद्यान, देवीपारा, मागाठाणे, पोईसर (पूर्वीचे महिंद्रा अँड महिंद्रा), आकुर्ली (पूर्वीचे बांडोंगरी), कुरार (पूर्वीचे पुष्पा पार्क), दिंडोशी (पूर्वीचे पठाणवाडी), आरे, गोरेगाव ई (पूर्वीचे महानंद), जोगेश्वरी ई (पूर्वीचे जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (पूर्वीचे अंधेरी पूर्व).

मेट्रो भाडे  

०-३ किमी: १० रुपये

३-१२ किमी: २० रुपये

 १२-१८ किमी: ३० रुपये

१८-२४ किमी: ४० रुपये

 २४-३० किमी: ५० रुपये

Web Title: Metro train testing in full swing; Inauguration will be held by PM Narendra Modi today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.