Join us

कासारवडवली ते गायमुखपर्यंतचा परिसरही मेट्रोने जोडला जाणार; दोन लाख प्रवाशांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 7:08 AM

मुंबई मेट्रो-४ च्या विस्तारास शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या विस्तारामुळे कासारवडवली ते गायमुखपर्यंतचा परिसरही मेट्रोने जोडला जाईल. याचा दोन लाख प्रवाशांना फायदा होईल.

मुंबई : मुंबई मेट्रो-४ च्या विस्तारास शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या विस्तारामुळे कासारवडवली ते गायमुखपर्यंतचा परिसरही मेट्रोने जोडला जाईल. याचा दोन लाख प्रवाशांना फायदा होईल.मुंबईला ठाण्याशी मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो-४ हा प्रकल्प हाती घेतला होता. मूळ आराखड्यानुसार वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली असा मेट्रो -४ चा टप्पा निश्चित करण्यात आला होता. मात्र, ठाणे-घोडबंदर रस्त्याच्या दुतर्फा असलेली दाट लोकवस्ती आणि वाहतूककोंडी लक्षात घेत मेट्रो-४ चा विस्तार करत कासारवडवलीपासून पुढे गायमुखपर्यंत मेट्रो नेण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘मेट्रो मार्ग ४ अ’साठी ९४९ कोटींच्या खर्चास आज प्रशासकीय मान्यता मिळाली. मार्च २०२२ पर्यंत काम पूर्ण होईल. त्यासाठी एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. प्रकल्पाच्या स्थापत्य बांधकामासाठी साधारण ४४९ कोटींचा खर्च प्राधिकरणाच्या निधीतून केला जाईल.

टॅग्स :मेट्रो