मेट्रोचे सहा टप्पे तीन वर्षांत पूर्ण करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 06:02 AM2019-05-28T06:02:28+5:302019-05-28T06:02:32+5:30

मुंबईतील सहा मेट्रो मार्गिकांचे काम २०२२ पर्यंत तर विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे काम पुढील वर्षी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

The Metro will complete six steps in three years | मेट्रोचे सहा टप्पे तीन वर्षांत पूर्ण करणार

मेट्रोचे सहा टप्पे तीन वर्षांत पूर्ण करणार

Next

मुंबई : मुंबईतील सहा मेट्रो मार्गिकांचे काम २०२२ पर्यंत तर विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाचे काम पुढील वर्षी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. राज्यातील रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशीत्यांनी संवाद साधला.
मेट्रो मार्ग -२ बी, ३,४,४ ए, ५ आणि ६ यामार्गाचे ११९ किलोमीटररचे तसेच अतिरिक्त १६९ किलोमीटर मार्गिकेचे काम २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. वर्धा-नागपूर आणि अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम लवकरच सुरु करण्यात येईल. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो महामार्ग विकसित करण्यासाठी तंत्रनिकेतनाची ५.७६ हेक्टर जमीन तसेच ग्रामीण भागातील ४ हेक्टर आणि बाळेवाडीतील ४ हेक्टर जमीन विकसित करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करण्यासाठी पीएमसीला जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे.
मुंबई मेट्रो मार्ग ३ कुलाबा ते बांद्रा, सिप्झ कॉरिडॉर, नागपूर मेट्रो, मोनोरेल, मेट्रो मार्ग ४ ए, मेट्रो मार्ग ६ समर्थ नगर ते विक्रोळी, मेट्रो मार्ग ७ अंधेरी ते दहिसर, मेट्रो मार्ग २ बी डी. एन नगर ते मंदाले, मेट्रो मार्ग क्र.२ ए दहिसर पूर्व ते डी.एन नगर तसेच भेंडीबाजार पुनर्विकास या विषयावर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, कृषी विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकासच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ह्यम्हाडाह्णचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.
>कामांना गती देण्यासाठी नियोजन करा
मुंबईत सुरु असलेल्या मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी कामाचे योग्य नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मेट्रो मार्ग क्र. ७ अंधेरी-दहिसर हा मार्ग विकसित करण्यासाठी जमिनीचे हस्तांतरण करणे, तसेच मेट्रो मार्ग क्र.४ वडाळा ते कासरवडवली विकसित करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.

Web Title: The Metro will complete six steps in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.