Join us

मेट्रो अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंधेरी-घाटकोपर-वर्सोवा मार्गावर धावणारी मेट्रो रेल शुक्रवारपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ब्रेक द चेनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंधेरी-घाटकोपर-वर्सोवा मार्गावर धावणारी मेट्रो रेल शुक्रवारपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत धावेल, अशी माहिती मुंबई मेट्रो वनकडून देण्यात आली. दररोज मेट्रोच्या किती फेऱ्या चालविल्या जाणार याची माहिती मात्र शुक्रवारी दिली जाईल, असेदेखील मुंबई मेट्रो वनकडून सांगण्यात आले.

ब्रेक द चेननुसार शनिवारी आणि रविवारी मेट्रोच्या फेऱ्या कमी असल्या तरी या दिवशी मेट्रोची सेवा सुरू आहे. रेल्वे, बेस्ट, रिक्षा आणि इतर वाहतुकीवर येणारा ताण कमी करण्यासह प्रवाशांना विनासायास सेवा मिळावी म्हणून हे काम केले जात असल्याचा दावा मुंबई मेट्रो वनने केला आहे. या सेवा देताना कोरोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत, असेही मुंबई मेट्रो वनने म्हटले आहे.

............................