मेट्रो धावणार; पण आता कोंडी कोण फोडणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 11:24 AM2023-05-22T11:24:01+5:302023-05-22T11:24:10+5:30
ऐन गर्दीच्यावेळी ही कोंडी वाढत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो २ ब चे वेगाने काम सुरू असले तरी कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मेट्रो कामासाठी बॅरिकेट्स लावण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोडसह कुर्ला रेल्वे स्थानक आणि लालबहादूर शास्त्री मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर मेट्रोच्या कामामुळे कोंडीत भर पडत असून, यावर ठोस उपाय योजावेत यावर जोर दिला जात आहे. कारण ऐन गर्दीच्यावेळी ही कोंडी वाढत असून, यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
३० मिनिटे कोंडीत
कुर्ला स्थानक ते डेपो हे अंतर कापण्यासाठी केवळ दहा मिनिटे लागतात. मात्र, या कामामुळे हे अंतर ३० मिनिटे तर कधी कधी ४५ मिनिटे एवढे होते. याच मार्गावरून बीकेसीमध्ये जाता येते. बीकेसीमध्ये जाण्यासाठीही ही कोंडी अडथळा ठरत आहे.
जुना आग्रा रोड
मुंबई आणि ठाणे या दोन शहरांना लालबहादूर शास्त्री मार्ग हा मुख्य रस्ता जोडतो. जुना आग्रा रोड म्हणून त्याची ओळख आहे. या मार्गाला जोडून मेट्रो २ ब चे काम सुरू आहे.
लिंक रोड
सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोड हा पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडतो. या मार्गाजवळ मेट्रो २ ब चे काम सुरू आहे. या कामाचा लिंक रोडला मोठा फटका बसत आहे.
स्टेशन रोड
कुर्ला रेल्वे स्थानकाकडून सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडसह लालबहादूर शास्त्री मार्गाकडे येताना मेट्रो २ ब च्या कामाचा फटका बसतो. कारण यामुळे एल वॉर्डपासून कुर्ला बेस्ट डेपोपर्यंत वाहनांची कोंडी होते.
मेट्रो २ ब
मार्ग : डी.एन.नगर
ते मानखुर्द - मंडाळे
किमी : २३.६४ लांब
मेट्रो कार डेपो : मंडाळे येथील
३० हेक्टर जागेत
कोणाला जोडणार?
n कुर्ला रेल्वे स्थानक
n मानखुर्द रेल्वे स्थानक
n मोनोरेलचे चेंबूर स्थानक
n डी.एन. नगर, मेट्रो मार्ग १
n कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो ३ मार्गाशी वांद्रे येथील जंक्शन
n वडाळा ते कासारवडवली (ठाणे) दरम्यान धावणाऱ्या मेट्रो ४ सोबत कुर्ला