बीकेसीसह धारावी येथील मेट्रो कामाला हिरवा कंदील

By admin | Published: May 23, 2017 03:41 AM2017-05-23T03:41:20+5:302017-05-23T03:41:20+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कामादरम्यान वृक्षतोडीप्रकरणी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलासा दिला असतानाच

Metro work in Dharavi with BKC green lantern | बीकेसीसह धारावी येथील मेट्रो कामाला हिरवा कंदील

बीकेसीसह धारावी येथील मेट्रो कामाला हिरवा कंदील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कामादरम्यान वृक्षतोडीप्रकरणी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलासा दिला असतानाच, आता केंद्रीय पर्यावरण खात्याने याच प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल आणि धारावी येथील काम सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी या सांगितले की, ‘वांद्रे-कुर्ला संकुल व धारावीतील कामाच्या मंजुरीमुळे प्रकल्पाला आणखी गती येईल. महत्त्वाचे म्हणजे, भविष्यातील कामादरम्यान येथील तिवरांची हानी होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार असून, या संदर्भातील योजनेला मंजुरी मिळावी, म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव कांदळवन संवर्धन विभागाकडे लवकरच सादर करणार आहोत.’

Web Title: Metro work in Dharavi with BKC green lantern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.