Join us

बीकेसीसह धारावी येथील मेट्रो कामाला हिरवा कंदील

By admin | Published: May 23, 2017 3:41 AM

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कामादरम्यान वृक्षतोडीप्रकरणी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलासा दिला असतानाच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कामादरम्यान वृक्षतोडीप्रकरणी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला दिलासा दिला असतानाच, आता केंद्रीय पर्यावरण खात्याने याच प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल आणि धारावी येथील काम सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी या सांगितले की, ‘वांद्रे-कुर्ला संकुल व धारावीतील कामाच्या मंजुरीमुळे प्रकल्पाला आणखी गती येईल. महत्त्वाचे म्हणजे, भविष्यातील कामादरम्यान येथील तिवरांची हानी होणार नाही, याची खबरदारी आम्ही घेणार असून, या संदर्भातील योजनेला मंजुरी मिळावी, म्हणून आम्ही आमचा प्रस्ताव कांदळवन संवर्धन विभागाकडे लवकरच सादर करणार आहोत.’