मेट्रोचे काम आता जलद होणार, प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी नेमले सात टीम लीडर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 02:19 AM2023-08-27T02:19:04+5:302023-08-27T02:19:35+5:30

मेट्रोचे काम आता जलद होणार, प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी नेमले सात टीम लीडर

Metro work will now speed up, seven team leaders have been appointed to complete the project on time | मेट्रोचे काम आता जलद होणार, प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी नेमले सात टीम लीडर

मेट्रोचे काम आता जलद होणार, प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी नेमले सात टीम लीडर

googlenewsNext

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखकर व जलद व्हावा यासाठी एमएमआरडीएमार्फत मेट्रोचे जाळे विणले जात आहे. शहर उपनगरात मेट्रोचे काम युद्धपातळीवर सुरू असून ती कामे वेळेत पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यासाठी एमएमआरडीएकडून सात टीम लीडर नेमण्यात आले आहेत. ७ मेट्रो प्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी टीम लीडर नेमण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगर प्रदेशात प्राधिकरणामार्फत मेट्रोचे जाळे विकसित करण्यात येत असून  शहरात सक्षम  वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. ही वाहतूक व्यवस्था नियोजित वेळेत पूर्ण व्हावी यासाठी महानगर आयुक्तांनी  प्रत्येक मेट्रो मार्गिकेसाठी त्यासोबतच मेट्रो भवनासाठी टीम लीडर्सची नियुक्ती केली आहे. या सर्व प्रकल्पांचे पर्यवेक्षण टीम लीडर्सच्या माध्यमातून केले जाणार आहे.  एमएमआरडीएच्या सर्व योजनांचा फायदा हा नागरिकांना  होणार आहे. मेट्रोसह सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने यापुढे अशी अनेक धोरणे अवलंबणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

टीम 
लीडर्सची भूमिका?

नियुक्त केलेले टीम लीडर त्या संदर्भातील योजना आखून, महानगर आयुक्तांच्या सल्ल्यानुसार गुणवत्तापूर्ण सर्व मेट्रो मार्गांचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत. 

टीम लीडर हा संचालक, मुख्य अभियंता किंवा अतिरिक्त मुख्य अभियंता या पदांवरील अधिकारी असेल. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेली टीम ही  अनुभवाचा उपयोग करून प्रकल्पाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर राहील. टीम लीडर प्रकल्पातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात उद्भवणाऱ्या सर्व समस्या कमी करून प्रकल्प प्रगतीसाठी कार्यरत राहतील.

टीम लीडर जबाबदार
प्रकल्प व्यवस्थापन क्रियाकलापांच्या सर्वसमावेशक पर्यवेक्षणासाठी टीम लीडर जबाबदार असतील. त्यासोबत प्रकल्पाच्या भौतिक आणि आर्थिक प्रगती या दोन्हींच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, तसेच स्थानके, व्हायाडक्ट्स, डेपो, पूल आणि प्रमुख अभियांत्रिकी इमारतींचे नियमित ऑन-साइट मूल्यांकन आयोजित करणे, मेट्रो मार्गिकेच्या परिसरात आणि मल्टी-मॉडल इंटिग्रेशन डेव्हलपमेंट या कामाचा समावेश आहे.

टीम लीडर्सची भूमिका?

Web Title: Metro work will now speed up, seven team leaders have been appointed to complete the project on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई