मेट्रोत खाद्यपदार्थ, पेय नेल्यास ५०० रुपये दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 01:33 AM2019-03-06T01:33:35+5:302019-03-06T01:33:51+5:30

मेट्रो ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ आणि पेय नेण्यास प्रतिबंध असले तरीदेखील अनेक प्रवाशांकडून या नियमाचे उल्लंघन केले जाते.

Metrot Food | मेट्रोत खाद्यपदार्थ, पेय नेल्यास ५०० रुपये दंड

मेट्रोत खाद्यपदार्थ, पेय नेल्यास ५०० रुपये दंड

googlenewsNext

मुंबई : मेट्रो ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ आणि पेय नेण्यास प्रतिबंध असले तरीदेखील अनेक प्रवाशांकडून या नियमाचे उल्लंघन केले जाते. परिणामी या नियमांचे प्रवाशांकडून उल्लंघन होऊ नये आणि मेट्रो स्वच्छ राहवी म्हणून आता विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधिताला पाचशे रुपये दंड ठोठवला जाणार आहे.
मुंबई मेट्रो वनचे बहुतांश प्रवासी नियमाचे पालन करतात. काही प्रवासी या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. प्रवाशांसाठी कॉनकोर्स लेव्हला फूडस्टॉल्स उपलब्ध असून, या फूडस्टॉलवरच आपले खाद्यपदार्थ संपवून प्रवाशांनी ट्रेनमध्ये प्रवेश करावा, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
प्रवाशांनी मेट्रो ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ किंवा पेय आणू नये यासाठी मुंबई मेट्रो वनने आवाहन केले आहे. २७ फेब्रुवारी ते १३ मार्च २०१९ दरम्यान याकरिता विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ट्रेनमध्ये श्राव्य घोषणा (आॅडिओ अनाउन्समेंट्स), फूडस्टॉल्स आणि स्टेशनवर पोस्टर्स, फलकांद्वारे संदेश दिले जात आहेत. स्टेशनवर डिजिटल स्क्रीन्स आणि ट्रेनमध्ये एलसीडी स्क्रीन्सही लावण्यात आले आहेत.
> स्वच्छतेचे उपाय
लाइट क्लिनिंग - मेट्रो कायम चकचकीत रहावी.
डीप क्लिनिंग - काही भाग घासुन, पुसून विशेष लक्ष दिले जाते.
स्टॉप अँड क्लिनिंग - प्रत्येक फेरीनंतर प्रत्येक ट्रेनची स्वच्छता.
आॅन द गो क्लिनिंग - आकस्मिकता निर्माण झाल्यास तातडीने स्वच्छता.
काय करावे?
स्वच्छतेसाठी प्रवाशांनीच सावधगिरी बाळगावी.
ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ खाणाऱ्या किंवा पेय पिणाऱ्या प्रवाशाला अन्य प्रवाशांनीच रोखावे.
हाऊसकिपिंग टीमकडून स्वच्छतेवर लक्ष ठेवले जाते.
मेट्रो डेपोमध्येही क्लिनिंग टीम तपासणी करते.
मेट्रो कायद्यानुसार ट्रेनमध्ये खाणे किंवा पिणे हे नियमाचे उल्लंघन ठरते.
नियमांचं उल्लघंन केल्यास प्रवाशावर मेट्रो कायद्यानुसार दंडनीय कारवाई केली जाईल.
त्यानुसार ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.

Web Title: Metrot Food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो