Join us

म्हाडाच्या इमारतींचा होणार पुनर्विकास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 6:34 AM

३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. जवळपास ३८८  इमारतींमध्ये ३० ते ४० हजार कुटुंब राहतात, या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई : दक्षिण मुंबईतील म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाच्या पुनर्रचित इमारतींच्या पंतप्रधान अनुदान प्रकल्पातील ६६ इमारती तसेच सेस इमारतीच्या धर्तीवर चटईक्षेत्रफळाचा लाभ देऊन या इमारतींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाचा निर्णय शिंदे - फडणवीस सरकार घेणार आहे. ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. जवळपास ३८८  इमारतींमध्ये ३० ते ४० हजार कुटुंब राहतात, या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विकास नियंत्रण नियमावलीत ३३(२४) या खंडामध्ये सुधारण करून ३३ (७) चे सर्व फायदे लागू करून इमारतींचा पुनर्विकास होण्याबाबत सरकार सकारात्मक असून आठवडाभरात यावर निर्णय होणार आहे. अत्यंत खराब झालेल्या या इमारतीतील हजारो लोकांना यामुळे दिलासा मिळेल. या निर्णयाने १६० /२२५ चौ फूट क्षेत्रफळाच्या सर्व भाडेकरू/ रहिवाशांचे मोठ्या क्षेत्रफळाच्या खपाचे स्वप्न साकार होईल. हा प्रस्ताव म्हाडाकडून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. सदर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.  

टॅग्स :म्हाडाराज्य सरकार