मुंबई: म्हाडानंआमदारांच्या कोट्यात निम्म्यानं घट केली आहे. म्हाडाच्या लॉटरीत सध्या आमदारांचा कोटा 2 टक्के इतका आहे. तो आता 1 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. आमदारांच्या बदल्यात खेळाडू आणि अनाथांना घर देण्यात येणार आहे. यापुढे म्हाडाच्या लॉटरीत आमदारांसाठी फक्त 1 टक्का कोटा असेल. म्हाडाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्या लॉटरीत आमदार, खासदार, पत्रकार, माजी सैनिक, अनुसूचित जाती, जमाती, अपंग यांना स्वतंत्र कोटा असतो. यापैकी आमदारांच्या कोट्याबद्दल अनेकदा सर्वसामान्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते. त्यामुळेच आता म्हाडानं आमदारांच्या कोट्यात घट केली आहे. सध्या आमदारांचा कोटा 2 टक्के इतका आहे. त्यात आता निम्म्यानं घट केली जाणार आहे. त्यामुळे हा कोटा 1 टक्क्यावर येईल. त्याऐवजी आता खेळाडू आणि अनाथांना कोटा देण्यात येईल. म्हाडाच्या या निर्णयामुळे अनाथ आणि खेळाडूंना मोठा फायदा होणार आहे.
म्हाडानं घटवला आमदारांचा कोटा; खेळाडू, अनाथांना होणार फायदा मोठा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 4:10 PM