मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्यावतीने ५ हजार ३११ घरांची लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र प्राधिकरणाला अद्याप लॉटरी काढण्यासाठीचा मुहूर्त मिळालेला नाही. तत्पूर्वी १३ डिसेंबरला घरांची लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रशासकीय कारणात्सव घरांची लॉटरी पुढे ढकलण्यात आली. आता डिसेंबरच्या उत्तरार्धात लॉटरी काढण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली असली तरी प्राधिकरणाकडून निश्चित, अशी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या ५,३११ घरांच्या विक्रीकरिता लॉटरी काढण्यात येणार आहे.
प्रक्रियेचा शुभारंभ : लॉटरीची तारीख अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी ऑनलाइनएकूण ३०,६८७ अर्ज प्राप्तअनामत रकमेसह २४३०३ अर्ज प्राप्त
लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली:
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १,०१० घरे
एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत १,०३७ घरे
सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ९१९ घरे
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्यासाठी ६७ घरे