म्हाडाच्या २१७ घरांसाठी नोंदणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 05:24 AM2019-03-08T05:24:29+5:302019-03-08T05:24:42+5:30
ई लिलावासाठी अर्जदारांची नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी वांद्रे पूर्वेतील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात करण्यात आला.
मुंबई : म्हाडाच्या २१७ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ तसेच मुंबई व कोकण मंडळांतर्गत येणाऱ्या दुकान गाळ्यांच्या ई लिलावासाठी अर्जदारांची नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी वांद्रे पूर्वेतील गृहनिर्माण भवन या म्हाडा मुख्यालयात करण्यात आला.
घरांची सोडत २१ एप्रिलला सकाळी १० वाजता वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात होईल. सोडतीबाबत माहितीपुस्तिका व अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दुकान गाळ्यांचा लिलाव ८ एप्रिलला सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर जाहीर केला जाईल. नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी ७ मार्चच्या दुपारी २ वाजेपासून १३ एप्रिलच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत असेल. अनामत रक्कम ७ मार्च ते १३ एप्रिलपर्यंत बँकेच्या कामकाजाच्या दिवशी व वेळेमध्ये भरता येईल.
कुठे आहेत घरे?
अल्प उत्पन्न गटासाठी सहकार नगर, चेंबूर येथील १७० सदनिका तर मध्यम उत्पन्न गटासाठी सहकार नगर-चेंबूर, कोपरी-पवई येथील ४७ सदनिका आहेत. या सर्व सदनिकांना भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे.
येथे गाळे उपलब्ध
प्रतीक्षा नगर-शीव (सायन), न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावे नगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्री नगर-गोरेगाव, सिद्धार्थ नगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी - मालाड येथील २०१ गाळे. कोकण मंडळांतर्गतच्या विरार बोळींज, वेंगुर्ला सिंधुदुर्ग येथील ७७ गाळे.
>पालघरच्या पोलिसांसाठी १८६ घरांची लॉटरी
म्हाडाने पालघर जिल्ह्यातील पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी १८६ घरे विक्रीसाठी
उपलब्ध केली आहेत. पालघर जिल्ह्यातील विरारपासून जवळ असणाºया बोळींज येथे अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे
असतील. घरांची किंमत २६,४४,०२३ ते २७,३९,६७२ रुपयांपर्यंत आहे.
अनामत रक्कम १०,३३६ रुपये आहे. ११ मार्च ते १० एप्रिलपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्जांची विक्री होईल.
११ मार्च त १० एप्रिलपर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. वांद्रे पूर्व, म्हाडा इमारतीत कोकण मंडळाच्या मिळकत व्यवस्थापक-२ येथे अर्जांची विक्री, ते स्वीकारले जातील. अर्ज शुल्क ३३६ रुपये आहे. ते विनापरतावा आहे.