Join us

म्हाडा लॉटरी : अर्जाचा आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 9:48 AM

MHADA Home: म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाइन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्याकरिता १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार, बुधवारी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. २१ एप्रिल रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन व आरटीजीएस / एनइएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाइन संगणकीय सोडत १० मे रोजी सकाळी १० वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे. आजतागायत ४७,०९१ अर्जदारांनी सोडतीसाठी अर्ज केले असून त्यापैकी ३२,४१५ अर्जदारांनी अर्जासह आवश्यक अनामत रक्कम भरली आहे. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. १० मे रोजी सकाळी १० वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून, अर्जदारांना सोडतीचा निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएसद्वारे, ई-मेलद्वारे तसेच ॲपवर प्राप्त होणार आहे. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी ०२२ - ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :म्हाडासुंदर गृहनियोजन