म्हाडा घरांच्या लॉटरीची ऑनलाइन नोंदणी संपली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 05:29 AM2018-12-11T05:29:38+5:302018-12-11T05:30:12+5:30

म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे काढलेल्या घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली आहे. सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत १ लाख ६० हजार अर्जदारांनी अर्ज भरले आहेत.

MHADA house lottery online registration ended | म्हाडा घरांच्या लॉटरीची ऑनलाइन नोंदणी संपली

म्हाडा घरांच्या लॉटरीची ऑनलाइन नोंदणी संपली

googlenewsNext

मुंबई : म्हाडाच्यामुंबई मंडळाद्वारे काढलेल्या घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली आहे. सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत १ लाख ६० हजार अर्जदारांनी अर्ज भरले आहेत. ज्या अर्जदारांनी योग्य तपशील भरला आहे, तसेच ज्यांनी अनामत रक्कम भरली आहे, असेच अर्ज गृहीत धरले जातील, असे म्हाडाकडून सांगण्यात आले. मुंबई मंडळाच्या १३८४ घरांसाठी ही लॉटरी आहे. ऑनलाइन अर्जनोंदणी आता पूर्ण झाली असून १६ डिसेंबरला मुंबई मंडळाची घरांची लॉटरी फुटणार आहे.

सोमवारी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने अर्जदारांची धावपळ सुरू होती. अर्जदारांचा लाखांचा टप्पा याआधीच पार पडला होता. म्हाडाच्या घरांसाठी ५ नोव्हेंबरपासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. म्हाडाच्या या लॉटरीत अ‍ॅण्टॉप हिल वडाळा येथे २७८ घरे, प्रतीक्षानगर सायन येथे ८९ घरे, गव्हाणपाडा, मुलुंडमध्ये २६९ घरे, पी.एम.जी.पी. मानखुर्दमध्ये ३१६ घरे, सिद्धार्थनगर, गोरेगावला २४ घरे, महावीरनगर, कांदिवलीमध्ये १७० घरे, तुंगा, पवईमध्ये १०१ घरे, मुंबई इमारत दुरुस्ती व मंडळद्वारे प्राप्त ५० घरे, विकास नियंत्रण विनियम ३३(५) अंतर्गत प्राप्त १९ आणि विखुरलेली ६८ घरे आहेत.

Web Title: MHADA house lottery online registration ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.