म्हाडाच्या लॉटरीत सर्वाधिक घरं अल्प उत्पन्न गटासाठी; जाणून घ्या किंमत किती!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 06:03 PM2018-11-03T18:03:12+5:302018-11-03T18:05:50+5:30
येत्या ५ नोव्हेंबरला म्हाडाच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि १० डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.
मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आशेचा किरण असलेल्या म्हाडाची १,३८४ सदनिकांची सोडत १६ डिसेंबरला निघणार आहे. ५ नोव्हेंबरला या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि १० डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी आपण कोणत्या उत्पन्न गटात येतो, त्या उत्पन्न गटासाठी किती घरं आहेत आणि त्यांची किंमत काय, या संदर्भातील सविस्तर माहिती म्हाडानं जाहीर केली आहे.
उत्पन्न गटानुसार वर्गीकरण (मासिक)
अत्यल्प उत्पन्न गटः २५ हजार रुपयांपर्यंत
अल्प उत्पन्न गटः २५,००१ रुपये ते ५०,००० रुपये
मध्यम उत्पन्न गटः ५०,००१ रुपये ते ७५,००० रुपये
उच्च उत्पन्न गटः ७५,००१ रुपये व त्यापेक्षा अधिक
उत्पन्न गटनिहाय उपलब्ध सदनिका
अत्यल्प उत्पन्न गटः ६३ सदनिका
अल्प उत्पन्न गटः ९२६ सदनिका
मध्यम उत्पन्न गटः २०१ सदनिका
उच्च उत्पन्न गटः १९४ सदनिका
सदनिकांची विक्री किंमत
अत्यल्प उत्पन्न गटः २० लाख रु. वा त्यापेक्षा कमी
अल्प उत्पन्न गटः २० लाख ते ३५ लाख रुपयांपर्यंत
मध्यम उत्पन्न गटः ३५ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत
उच्च उत्पन्न गटः ६० लाख व त्याहून अधिक
विविध प्रवर्गांसाठी आरक्षित सदनिका
अनुसूचित जाती नवबौद्धांसह - १५७ सदनिका
अनुसूचित जमाती - ८७ सदनिका
भटक्या जमाती - २२ सदनिका
विमुक्त जमाती - २१ सदनिका
पत्रकार - ३६ सदनिका
स्वातंत्र्यसैनिक - ३६ सदनिका
अंध व अपंग व्यक्ती - ४३ सदनिका
संरक्षण दल - २८ सदनिका
माजी सैनिक - ७० सदनिका
आजी-माजी आमदार / खासदार - २६
म्हाडा कर्मचारी - २८
राज्य शासनाचे कर्मचारी - ७०
केंद्र शासनाचे कर्मचारी - २८
कलाकार - २८
सर्वसामान्य जनता - ७०४
कुठे, किती घरं?
अॅन्टॉप हिल, वडाळा - २७८ सदनिका
प्रतीक्षानगर, सायन - ८९ सदनिका
गव्हाणपाडा, मुलुंड - २६९ सदनिका
पी. एम. जी. पी. मानखुर्द - ३१६ सदनिका
सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प) - २४ सदनिका
महावीरनगर, कांदिवली (प) - १७० सदनिका
तुंगा, पवई - १०१ सदनिका
मुं. इ. दु. व पु. मंडळामार्फत प्राप्त सदनिका - ५०
विकास नियंत्रण विनियम ३३ (५) अंतर्गत - १९ सदनिका
विखुरलेल्या सदनिका - ६८
म्हाडाच्या सोडतीचं वेळापत्रक
>> ५ नोव्हेंबर २०१८ - जाहिरात प्रसिद्धी आणि ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी सुरुवात
>> १० डिसेंबर २०१८ - अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख
>> १६ डिसेंबर २०१८ - सोडतीचा दिनांक