Join us

म्हाडाच्या लॉटरीत सर्वाधिक घरं अल्प उत्पन्न गटासाठी; जाणून घ्या किंमत किती!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 6:03 PM

येत्या ५ नोव्हेंबरला म्हाडाच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि १० डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आशेचा किरण असलेल्या म्हाडाची १,३८४ सदनिकांची सोडत १६ डिसेंबरला निघणार आहे. ५ नोव्हेंबरला या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध होईल आणि १० डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. त्यासाठी आपण कोणत्या उत्पन्न गटात येतो, त्या उत्पन्न गटासाठी किती घरं आहेत आणि त्यांची किंमत काय, या संदर्भातील सविस्तर माहिती म्हाडानं जाहीर केली आहे.  

उत्पन्न गटानुसार वर्गीकरण (मासिक)

अत्यल्प उत्पन्न गटः २५ हजार रुपयांपर्यंतअल्प उत्पन्न गटः २५,००१ रुपये ते ५०,००० रुपयेमध्यम उत्पन्न गटः ५०,००१ रुपये ते ७५,००० रुपयेउच्च उत्पन्न गटः ७५,००१ रुपये व त्यापेक्षा अधिक

उत्पन्न गटनिहाय उपलब्ध सदनिका 

अत्यल्प उत्पन्न गटः ६३ सदनिकाअल्प उत्पन्न गटः ९२६ सदनिकामध्यम उत्पन्न गटः २०१ सदनिकाउच्च उत्पन्न गटः १९४ सदनिका

सदनिकांची विक्री किंमत

अत्यल्प उत्पन्न गटः २० लाख रु. वा त्यापेक्षा कमीअल्प उत्पन्न गटः २० लाख ते ३५ लाख रुपयांपर्यंतमध्यम उत्पन्न गटः ३५ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंतउच्च उत्पन्न गटः ६० लाख व त्याहून अधिक

विविध प्रवर्गांसाठी आरक्षित सदनिका

अनुसूचित जाती नवबौद्धांसह - १५७ सदनिकाअनुसूचित जमाती - ८७ सदनिकाभटक्या जमाती - २२ सदनिकाविमुक्त जमाती - २१ सदनिकापत्रकार - ३६ सदनिकास्वातंत्र्यसैनिक - ३६ सदनिकाअंध व अपंग व्यक्ती - ४३ सदनिकासंरक्षण दल - २८ सदनिकामाजी सैनिक - ७० सदनिकाआजी-माजी आमदार / खासदार - २६म्हाडा कर्मचारी - २८राज्य शासनाचे कर्मचारी - ७०केंद्र शासनाचे कर्मचारी - २८कलाकार - २८सर्वसामान्य जनता - ७०४

कुठे, किती घरं?

अॅन्टॉप हिल, वडाळा - २७८ सदनिकाप्रतीक्षानगर, सायन - ८९ सदनिकागव्हाणपाडा, मुलुंड - २६९ सदनिकापी. एम. जी. पी. मानखुर्द - ३१६ सदनिकासिद्धार्थ नगर, गोरेगाव (प) - २४ सदनिकामहावीरनगर, कांदिवली (प) - १७० सदनिकातुंगा, पवई - १०१ सदनिकामुं. इ. दु. व पु. मंडळामार्फत प्राप्त सदनिका - ५०विकास नियंत्रण विनियम ३३ (५) अंतर्गत - १९ सदनिकाविखुरलेल्या सदनिका - ६८ म्हाडाच्या सोडतीचं वेळापत्रक

>> ५ नोव्हेंबर २०१८ - जाहिरात प्रसिद्धी आणि ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी सुरुवात

>> १० डिसेंबर २०१८ - अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

>> १६ डिसेंबर २०१८ - सोडतीचा दिनांक

टॅग्स :म्हाडा