MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांची ५ फेब्रुवारीला लॉटरी; निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएसद्वारे दिसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 06:01 IST2025-01-26T06:00:37+5:302025-01-26T06:01:51+5:30
या लॉटरीसाठी सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह आले आहेत.

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या घरांची ५ फेब्रुवारीला लॉटरी; निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएसद्वारे दिसणार
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची २,१४७ घरे आणि ११० भूखंड विक्रीकरिता ५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह आले आहेत.
लॉटरीदिवशी अर्जदारांना निकाल तत्काळ मोबाइलवर एसएमएसद्वारे, ई-मेलद्वारे तसेच ॲपवर प्राप्त होईल, असे कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले.