मुंबईतील २१७ घरांसाठी म्हाडाच्या लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 08:00 IST2019-03-03T02:05:05+5:302019-03-03T08:00:04+5:30
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २१७ घरांसह मुंबई व कोकणातील २७६ दुकानांच्या सोडतीची जाहिरात ३ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.

मुंबईतील २१७ घरांसाठी म्हाडाच्या लॉटरी
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २१७ घरांसह मुंबई व कोकणातील २७६ दुकानांच्या सोडतीची जाहिरात ३ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.
अल्प उत्पन्न गटासाठी चेंबूरमधील शेल टॉवर येथील इमारत क्रमांक २, २३, ३७ मध्ये १७० सदनिका आहेत. सदनिकांचे क्षेत्रफळ ३४८ ते ३८१ चौरस फूट आहे. सदनिकांची किंमत ३१ लाख ५४ हजार ते ३४ लाख ३३ हजार आहे. चेंबूरमधील सहकारनगर येथे मध्यम उत्पन्न गटासाठी एक सदनिका आहे. तिची किंमत ३९ लाख ६४ हजार आहे. पवई येथे ४६ सदनिका आहेत. त्यांची किंमत ५५ लाख ६१ हजार आहे.
२१७ घरांसाठीची अर्ज नोंदणी ७ मार्चपासून सुरू होईल. अनामत रकमेसहित अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ एप्रिल आहे. २१ एप्रिल रोजी सोडत होईल. दरम्यान, २७६ दुकानांसाठी ५ मार्चपासून सकाळी ११ वाजता ई-लिलावाची नोंदणी सुरू होईल. ३० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज-अनामत रक्कम भरता येईल. ई-लिलाव सुरू होण्याची तारीख २ एप्रिल ते ५ एप्रिल आहे. दुकानांची सोडत ८ एप्रिल रोजी जाहीर होईल.