म्हाडाची ८,९८४ घरांची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:07 AM2021-08-22T04:07:33+5:302021-08-22T04:07:33+5:30

ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणे प्रक्रियेचा गो-लाइव्ह २४ ऑगस्टपासून लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या कल्याण, ...

MHADA lottery for 8,984 houses | म्हाडाची ८,९८४ घरांची लॉटरी

म्हाडाची ८,९८४ घरांची लॉटरी

googlenewsNext

ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणे प्रक्रियेचा गो-लाइव्ह २४ ऑगस्टपासून

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता २३ ऑगस्टपासून सोडत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ २४ ऑगस्ट रोजी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत होणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी या अनुषंगाने सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.

अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील. अर्ज नोंदणीची सुरुवात २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार २४ ऑगस्ट रोजीच दुपारी ३ पासून ऐच्छीक सदनिकेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करू शकतील. इच्छुक अर्जदार २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकतील. अर्जदारांना २३ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अनामत रकमेच्या ऑनलाइन स्वीकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ २४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे. ऑनलाइन बँकेत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा २४ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ पर्यंत अर्जदारांना करता येणार आहे.

----------------------

कुठे किती सदनिका

प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत ६ हजार १८० सदनिका

अत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२४ सदनिका

खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ५८६ सदनिका

सर्व्हे क्रमांक १६२ खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे २०१६ सदनिका

सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथे १७६९ सदनिका

गोठेघर (जि. ठाणे) येथे ११८५ सदनिका

----------------------

अत्यल्प उत्पन्न गट

मीरा रोड (ठाणे) १५ सदनिका

----------------------

अल्प उत्पन्न गट

विरार बोळींज येथील १ हजार ७४२ सदनिका

सर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथील ८८ सदनिका

----------------------

मध्यम उत्पन्न गट

विरार बोळींज येथे ३६ सदनिका

वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे २ सदनिका

सर्व्हे क्रमांक २१६ पीटी, २२१ पीटी मीरा रोड (जि. ठाणे) येथे १९६ सदनिका

----------------------

उच्च उत्पन्न गट

सर्व्हे क्रमांक ४९१, २३ पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे १ सदनिका सोडतीत आहे.

----------------------

सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न

अत्यल्प उत्पन्न गटासाठी २५ हजार

अल्प उत्पन्न गटासाठी २५,००१ ते ५० हजार

मध्यम उत्पन्न गटासाठी ५०,००१ ते ७५ हजार

उच्च उत्पन्न गटासाठी ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त

----------------------

अर्जदारांकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

Web Title: MHADA lottery for 8,984 houses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.