म्हाडातर्फे 21 पात्र झोपडीधारकांना सदनिका वाटपासाठी ८ जानेवारीला सोडत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2018 17:07 IST2018-01-06T17:06:18+5:302018-01-06T17:07:43+5:30
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील पुनर्वसन सदनिकांचे वाटप धारावीतील क्लस्टर जे मधील २१ निवासी पात्र झोपडीधारकांना करण्यासाठी ०८ जानेवारी २०१८ रोजी दुपारी दोन वाजता चिट्ठी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे.

म्हाडातर्फे 21 पात्र झोपडीधारकांना सदनिका वाटपासाठी ८ जानेवारीला सोडत
मुंबई- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील पुनर्वसन सदनिकांचे वाटप धारावीतील क्लस्टर जे मधील २१ निवासी पात्र झोपडीधारकांना करण्यासाठी ०८ जानेवारी २०१८ रोजी दुपारी दोन वाजता चिट्ठी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात आयोजित सदर सोडतीत पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका वाटप करावयाची यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे-२०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना तसेच ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना मार्च-२०१७ मध्ये पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.