मुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत उभारलेल्या ५८६३ सदनिकांच्या विक्रीकरिता २४ नोव्हेंबर रोजी आयोजित संगणकीय सोडत प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. सोडतीचा नवीन दिनांक संबंधित अर्जदारांना मोबाईलवर एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.
५ सप्टेंबर रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ६० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी मंडळातर्फे सोडतीसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.
कोणत्या जिल्ह्यात किती घरे
पुणे ५४२५
सोलापूर ६९
सांगली ३२
कोल्हापूर ३३७