मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याच्या धमकी आली आहे. अज्ञातांकडून आपल्याला धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याच्या तक्रारीचे एक पत्र त्यांनी पोलिस आयुक्तांना पाठवले आहे.
अनधिकृत विकासकामांच्या विरोधात भुमिका घेतल्याने आपल्याला या धमक्या येत असून त्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याचे त्यांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. जिवाचं बरं वाईट झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार असणार आहे. विकासक आणि समाजकंटक नाराज होत आहेत. काही अज्ञातांकडून धमक्या येत असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावं. याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचं ही त्यांनी सांगितले आहे.