म्हाडाचे अध्यक्षपद दहा वर्षांपासून रिक्त
By admin | Published: August 5, 2015 01:52 AM2015-08-05T01:52:17+5:302015-08-05T01:52:17+5:30
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्षपद गत १० वर्षांपासून रिक्त आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात या
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्षपद गत १० वर्षांपासून रिक्त आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात या पदावर कोणाचीच नियुक्ती न केल्याने म्हाडाच्या कारभारावर लोकप्रतिनिधीचा वचक राहिलेला नाही. परंतु विद्यमान सरकारच्या काळात या पदावर आपली वर्णी लावण्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली
आहे.
राज्यभरात विस्तारलेल्या आणि मुंबईतील झोपडपट्टी ते जुन्या इमारतींशी संबंधित असलेले म्हाडाचे अध्यक्षपद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्न करीत आहे. या पदावर वर्णी लावण्यासाठी भाजपा नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली असून, तशी फिल्डिंगही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लावली आहे.
सेना-भाजपाच्या कार्यकाळात म्हाडाचे अध्यक्षपद भाजपा नेते मधू चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यानंतर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर २00५पर्यंत काँग्रेस नेते मधू चव्हाण यांच्याकडे हे पद सोपविण्यात आले.
विलासराव देशमुख ते त्यानंतरच्या मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण विभागाचा कार्यभार आपल्या हाती ठेवला. त्यानंतर आजतागायत म्हाडाचे अध्यक्षपद रिक्त आहे.