Join us

म्हाडा महिला कर्मचाऱ्याला कंत्राटदाराकडून धक्काबुक्की

By admin | Published: September 17, 2015 3:02 AM

म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या महिला कर्मचाऱ्यास एका कंत्राटदाराने धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवारी म्हाडात घडला. मात्र, महिला कर्मचाऱ्याने याप्रकरणी भीतीपोटी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या महिला कर्मचाऱ्यास एका कंत्राटदाराने धक्काबुक्की केल्याचा प्रकार बुधवारी म्हाडात घडला. मात्र, महिला कर्मचाऱ्याने याप्रकरणी भीतीपोटी कोणतीही तक्रार केली नसल्याने धक्काबुक्की करणारा कंत्राटदार अद्यापही मोकाट फिरत आहे. या कंत्राटदारावर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.सुधार मंडळाकडून झोपडपट्टीतील विविध कामांसाठी निविदा काढण्यात येतात. त्यानुसार एक कंत्राटदार काम पूर्ण केल्यानंतर म्हाडा कार्यालयात येत होता. परंतू त्याचे बील मंजूर होत नसल्याने संबंधीत कंत्राटदाराने सुधार मंडळाच्या लिपिक महिलेकडे विचारणा केली. यातून झालेल्या वादातून कंत्राटदाराने महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. परंतू, धक्काबुक्की झाल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने म्हाडा अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही. महिला कर्मचारी भयभीत झाल्याने तिने याबाबत माहिती लपविली असावी, असे म्हाडा अधिकाऱ्यांनी सांगितले. असा प्रकार घडला असल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले.