Join us

म्हाडाचे घर लागले नाही; अनामत परत करणे सुरू, ४ हजार घरांसाठी काढली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 6:10 AM

विजेत्या अर्जदारांना सूचना, देकार पत्र पाठविले जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: म्हाडाच्यावतीने काढण्यात आलेल्या सुमारे ४ हजार घरांच्या लॉटरीनंतर आता विजेत्या अर्जदारांना घराचा ताबा देण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून, विजेत्या अर्जदारांना सूचना, देकार पत्र पाठविले जात आहे. ३० ऑगस्टनंतर घराचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल व  घराची रक्कम जमा केली की विजेत्या अर्जदाराला ताबडतोब घराचा ताबा दिला जाईल, असे दावा म्हाडाने म्हटले आहे.

गेल्या सोमवारी म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात आली होती. सुमारे ४ हजार घरांच्या लॉटरीत अनेक भाग्यवंतांना घरे लागली होती. तर ज्यांना घर लागलेले नाही; अशा अर्जदारांना अनामत रक्कम परत करण्यास म्हाडाकडून सुरुवात झाली आहे. यातील तांत्रिक अडथळे दूर केले जात आहे. ३० ऑगस्टनंतर घरांच्या ताबा देण्याच्या प्रक्रियेनुसार पहिल्यांदा २५ टक्के आणि नंतर ७५ टक्के रक्कम अर्जदारांना भरता येतील.

टॅग्स :म्हाडा