मुंबई : म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळाच्या माध्यमातून मुंबईतील उपकरप्राप्त तेवीस इमारती अतिधोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना म्हाडामार्फत पावसाळ्यापूर्वी घरे खाली करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत, मात्र तरीही या इमारतींमधील सुमारे ३२९ कुटुंबांनी घरे खाली केलेली नाहीत. या अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी स्पष्ट केले. या धोकादायक इमारतींची माहिती देण्यासंदर्भात मंगळवारी म्हाडाच्या मुख्यालयामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेहोते.
मुंबईतील शहरी भागातील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींपैकी २३ इमारती अतिधोकादायक असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून खबरदारी म्हणून या रहिवाशांना संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहे. जे रहिवासी स्थलांतरीत होणार नाहीत त्यांना बळजबरीने स्थलांतरीत करण्यात येईल, तसेच या इमारतींचे पाणी आणि वीजही तोडण्यात येईल असेही म्हाडाने स्पष्ट केले. दरवर्षी म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळातर्फे मुंबईतील जुन्या आणी मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार मंडळ स्तरावर केलेल्या सर्वेक्षणातून एकूण २३ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याचे आढळून आले आहे. उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण पावसाळापूर्व कालावधीसाठीच न करता सतत सुरू ठेवण्याचे निर्देश सर्व कार्यकारी अभियंता आणि उपमुख्य अभियंता यांना देण्यात आल्याचे इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी डी. के. जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच त्यानुसार मंडळ स्तरावर सर्वेक्षणाची कार्यवाही सतत चालू असून अतिधोकादायक इमारतींव्यतिरिक्त आणखी काही इमारती आढळल्यास अतिधोकादायक इमारतींच्या संखेत वाढ होऊ शकते, त्यानुसार त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असेही जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या २३ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ५०७ निवासी आणि ३०८ अनिवासी असे एकूण ८१५ गाळे आहेत. यातील १९७ गाळेधारकांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात पाठवले असून ३२९ निवासी भाडेकरूंची संक्रमण शिबिरांमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याचे, म्हाडाने स्पष्ट केले.
नियंत्रण कक्ष २४ तास सुरूइमारतीच्या धोक्याची लक्षणे किंवा इमारत कोसळल्याचे मंडळाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी म्हाडाने ताडदेव येथे नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी म्हाडाने २३५३६९४५/ २३५१७४२३ आणि ९१६७५५२११२ हे क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत.
२०१९ सर्वेक्षणातील अतिधोकादायक इमारती१४४, एम जी रोड, एक्स्प्लेन्ड मेन्शन२०८-२२० काझी सय्यद स्ट्रिट२२-२४, उमरखाडी २ री क्रॉसलेन ,मुंबई सिराज लेन१४५- १५१, आरसी वालाबिल्डींग१५२ -१५४,चिमना बुचर स्ट्रीट१०१ -१११ बारा इमाम रोड,७४, निझाज स्ट्रीट,१२३, किका स्ट्रीट३८७-३९१, बदाम वाडी, व्ही.पी.रोड,२१८-२२०, डी १२३१ (१) & डी-१२३१(३) राजाराम मोहन राय मार्ग५ जे सुनंदा बिल्डींग, डी-१६१५(२) दुभाष लेन, गिरगाव,४१९ नूर मोहम्मद बेग, मोहम्मद कंपाऊंड, डी-४६९ व्ही.पी.रोड,४४३ वांदेकर मेंंशन, डी-४३१ डॉ.-४३१ डॉ.दादासाहेब भडकमकरमार्ग, गिरगाव२२६-२२८, राजाराम मोहन मार्ग, गिरगाव,२४१-२५१, डी-११९४ राहाराम मोहन रॉय मार्ग, गिरगाव५८-खत्तर गल्ली, मधुसुदन बिल्डींग खत्तर गल्ली, गिरगाव६९-८१, खेतवाडी ३ री गल्ली, गणेश भुवन इमारत ३९, चौपाटी, सी फेससी एस नं. ८२९,१/८२९ आणि ८३० दादाभाई चाल क्रमांक ५, लोअर परेल३७ डी, बॉम्बे हाऊस,डॉकयार्ड रोड२३ सक्सेस रोड, माझगाव१-१ ए, ३-३ ए, हाथीबाग, डी.एन.सिंग रोड