Join us

म्हाडाच्या संक्रमण शिबिरांची होणार लवकरच दुुरुस्ती; रहिवाशांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:56 AM

दुरुस्तीसाठी १५ कोटींच्या निधीची तरतूद

मुंबई : मुंबईमध्ये विविध ठिकाणी म्हाडाची संक्रमण शिबिरे आहेत. या संक्रमण शिबिरांची दुरुस्ती अनेक वर्षे रखडली होती. संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी म्हाडाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला १५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने हा दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. १५ कोटींच्या निधीमध्ये नऊ ठिकाणांच्या संक्रमण शिबिरांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.मुंबईमध्ये म्हाडाची ५६ संक्रमण शिबिरे आहेत. यामध्ये एकूण २१ हजार १३५ गाळे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी दुरुस्ती न झाल्याने या संक्रमण शिबिरांची अवस्था फार बिकट झाली होती. यावर मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी मुंबईतील वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात बैठका घेऊन संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. सरकारकडे म्हाडाने जुन्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी २०० कोटींची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने म्हाडाचाच निधी वापरावा, अशी सूचना केली होती. यानुसार, विशेष बाब म्हणून म्हाडाच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे़ आता नऊ ठिकाणच्या संक्रमण शिबिरांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.मुंबईतील उपलब्ध संक्रमण शिबिरातील ८ हजार ४४८ गाळ्यांमध्ये अपात्र अथवा अनधिकृत रहिवासी वास्तव्यास असून, यापैकी काही रहिवासी ४० वर्षांपेक्षा जास्त काळापासून तेथे राहत आहेत. संक्रमण शिबिरांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाल्याने, या सर्व रहिवाशांच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. निधीअभावी संक्रमण शिबिरातील इमारतींची डागडुजी, गळती, प्लास्टर, रंगकाम, पॅसेजमधील कामे, लादीकरण अशी कामे रखडली होती. आता ही कामे मार्गी लागणार आहेत.छतावरील शेडसाठी ५ कोटीमुंबईत म्हाडाच्या जुन्या इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात असून, पावसाळ्याच्या काळात या इमारतींच्या छतातून होणारी गळती रोखण्यासाठी येथे वॉटर प्रूफिंगही केले जाते. यानंतरही गळती थांबत नसल्याने येथील इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. निधीअभावी मागील वर्षी ही योजना राबविता आली नाही. शेडसाठी ५ कोटी इतका निधी उपलब्ध झाला असल्याने, पालिकेच्या परवानगीनंतर छतावरील शेड उभारण्याच्या कामाला टेंडर प्रक्रियेनंतर मान्यता दिली जाणार असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.संक्रमण शिबिरांसाठी मंजूर निधीमागाठणे संक्रमण शिबिर ५० लाखप्रतीक्षानगर सायन ०७ कोटीपेरू कम्पाउंड परेल ६० लाखज्ञानेश्वरनगर २५ लाखकन्नमवारनगर विक्रोळी ०४ कोटीसुभाषनगर चेंबूर १.५ कोटीचुनाभट्टी २५ लाखमोतीलालनगर २५ लाखधारावी १.८ कोटी

टॅग्स :म्हाडा