Join us

तुमच्या प्रश्नांची उत्तरे म्हाडा देणार, म्हाडामध्ये २२ जुलै रोजी लोकशाही दिन

By सचिन लुंगसे | Published: July 15, 2024 7:13 PM

Mumbai News: म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन २२ जुलै रोजी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे.

मुंबई - म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन २२ जुलै रोजी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे. जानेवारीपासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत तीन लोकशाही दिन घेण्यात आले असून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

एप्रिल ते जून या महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्याने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले नाही. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ व नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्याने लोकशाही दिनाच्या आयोजनावर निर्बंध होते.

म्हाडा प्रशासनाद्वारे नागरिकांना लोकशाही दिनाकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व / अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे /देण्यात येणार आहे अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल असे अर्ज म्हाडा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत, असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसात पाठवले जातील. 

टॅग्स :म्हाडामुंबई