रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था ‘म्हाडा’ करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:06 AM2021-03-20T04:06:24+5:302021-03-20T04:06:24+5:30
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील मोठमोठ्या रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी देशभरातून रुग्ण दाखल होत असतात. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकदेखील दाखल ...
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील मोठमोठ्या रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी देशभरातून रुग्ण दाखल होत असतात. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकदेखील दाखल होत असून, दाखल नातेवाइकांची येथे राहण्याची परवड होते. अनेक नातेवाइकांना रस्त्यांवर, पुलाखाली राहावे लागते; झोपावे लागते. रुग्णांवर उपचार होत असतानाच दुसरीकडे नातेवाइकांचे हाल होत असतात. जोवर रुग्णांवर उपचार सुरू असतात तोवर नातेवाइकांना असाच कुठेतरी आसरा घ्यावा लागतो. त्यांचे मुंबईत कोणी असेल तर काही काळ प्रश्न सुटतो. मात्र तो कायमस्वरूपी सुटत नाही. पावसाळ्यात तर रुग्णांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होतात. परळच्या पुलाखाली अथवा तात्पुरत्या स्वरूपात बाहेरच कुठेतरी राहत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांचे मोठे हाल होत असल्याने त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत. याच एका प्रयत्नानुसार, टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी ‘म्हाडा’च्या माध्यमातून तात्पुरती राहण्याची व्यवस्था करता येऊ शकते का, याची मी चाचपणी करतोय, अशा आशयाचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी करीत रुग्णांच्या नातेवाइकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.