मुंबई : म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये सहभागी झालेल्या विकासकांकडील थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या विक्रीसाठी देय असलेल्या इमारतींवर टाच आणली जाईल. याशिवाय इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र रोखणे, बँक खाती गोठविण्याची कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.प्रा. जोगेंद्र कवाडे, नागो गाणार आदींनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री आव्हाड म्हणाले की, म्हाडाकडे थकबाकी असलेल्या अनेक विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उरलेल्या विकासकांवर येत्या आठ दिवसांत गुन्हे दाखल होतील. थकबाकीदार विकासकांच्या जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. बँकखाती गोठवणे, त्यांच्या इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र रोखून धरणे अशा उपाययोजनाही हाती घेतल्या जातील, असेही ते म्हणाले.>मुंबईत वाढल्या आगीच्या घटनासदोष विद्युत प्रणालीमळेच मुंबईतील आगींच्या घटना घडत आहेत. मागील तीन वर्षांपैकी २०१९ साली सर्वाधिक ५,४२७ आगी लागल्या. यातील १७ आगी गंभीर स्वरूपाच्या होत्या, अशी माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. तर, मुंबईत २००८ ते २०१९ या बारा वर्षांच्या कालावधीत ५६,१४५ आगीच्या घटना घडल्या. यात ६७७ जणांचा मृत्यू झाल्याचे शिंदे यांनी दोन वेगवेगळ्या तारांकीत प्रश्नांच्या उत्तरात दिली.
म्हाडाच्या थकबाकीदार विकासकांची खाती गोठविणार - जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 12:02 AM