म्हाडा वसाहतींच्या सेवाशुल्कात सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:35 AM2020-12-17T04:35:21+5:302020-12-17T04:35:21+5:30

म्हाडा वसाहतींच्या सेवाशुल्कात सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : म्हाडा ...

MHADA will take a positive decision regarding rebate in service charges of colonies | म्हाडा वसाहतींच्या सेवाशुल्कात सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार

म्हाडा वसाहतींच्या सेवाशुल्कात सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार

Next

म्हाडा वसाहतींच्या सेवाशुल्कात सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : म्हाडा वसाहतीच्या ५६ गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवाशुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक असून यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीने प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

आज वर्षा निवासस्थान येथे म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवाशुल्कावर सूट देण्यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार मंगेश कुंडाळकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवासी प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीच्या थकीत सेवाशुल्कात सवलत देण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार अभय योजना तयार करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावा. तसेच भोगवटादार वर्ग २, जमिनीचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्याची स्थगिती उठवून कार्यवाही सुरू करण्यात यावी, असे निर्देश दिले.

बैठकीत स्वदेशी मिल कम्पाउंडमधील कामगारांच्या घरांबाबत व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचे तसेच नेहरूनगर म्हाडा वसाहतीतील पोलिसांच्या सेवानिवासस्थानाच्या......?

Web Title: MHADA will take a positive decision regarding rebate in service charges of colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.