म्हाडाच्या २१७ घरांची उद्या सोडत; म्हाडा भवनमध्ये सोडत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 03:07 AM2019-06-01T03:07:15+5:302019-06-01T06:13:57+5:30

या घरांसाठी तब्बल ७८ हजार ७७३ जणांनी अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी ६६ हजार ९९ जण पात्र ठरले. या लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई येथील २१७ घरांचा समावेश आहे.

Mhada's 217 houses to leave tomorrow Drop in MHADA building | म्हाडाच्या २१७ घरांची उद्या सोडत; म्हाडा भवनमध्ये सोडत होणार

म्हाडाच्या २१७ घरांची उद्या सोडत; म्हाडा भवनमध्ये सोडत होणार

Next

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे उद्या रविवारी २१७ सदनिकांसाठी म्हाडा भवनमध्ये सोडत होणार आहे. या घरांसाठी तब्बल ६६ हजार ९९ अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, आज मुंबई आणि कोकण विभागातील २७६ दुकानांची लॉटरीही जाहीर होणार असल्याचे म्हाडातर्फे सांगण्यात आले.
मुंबईतील २१७ सदनिकांची लॉटरी २१ एप्रिलला जाहीर होणार होती. मात्र, लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने ती पुढे ढकलण्यात आली होती. या घरांसाठी तब्बल ७८ हजार ७७३ जणांनी अर्ज केले होते. मात्र, त्यापैकी ६६ हजार ९९ जण पात्र ठरले. या लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई येथील २१७ घरांचा समावेश आहे. 

म्हाडाच्या २७६ दुकानांचा शनिवारी ई-लिलाव होणार असून, मुंबई मंडळांतर्गत असलेल्या प्रतीक्षानगर (सायन), न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावेनगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्रीनगर-गोरेगाव, सिद्धार्थनगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी- मालाड येथील २०१ गाळ्यांचा समावेश आहे. तर कोकण मंडळांतर्गतच्या विरार बोळिंज, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग येथील ७७ सदनिकांचा समावेश आहे. रविवारी सोडतीचा निकाल पाहण्यासाठी म्हाडा भवनमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता म्हाडाने चोख व्यवस्था ठेवली आहे.

Web Title: Mhada's 217 houses to leave tomorrow Drop in MHADA building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा