Join us

म्हाडाच्या ६ हजार घरांच्या प्रकल्प निविदेस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:36 AM

पहाडी-गोरेगाव येथील भूखंडावरील प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला अद्याप काहीच प्रतिसाद प्राप्त झालेला नाही.

मुंबई : पहाडी-गोरेगाव येथील भूखंडावरील प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला अद्याप काहीच प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निविदेतील अटीशर्तींमध्ये त्रुटी असल्याच्या कारणात्सव, एकाही कंपनीने निविदा भरलेली नाही. विशेष: ८ एप्रिल ही निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असतानाही एकाही कंपनीने प्रतिसाद दिला नाही. परिणामी, निविदा प्रक्रियेस म्हाडाने २४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.म्हाडा प्राधिकरणाचा येथे १५ एकरचा भूखंड आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच, भूखंड ााब्यात घेण्यात म्हाडाला यश आले. येथे म्हाडा सहा हजार घरे बांधणार आहे.