Join us

Mhada Lottery म्हाडाची 8984 घरांची लॉटरी; ऑनलाइन अर्ज नोंदणी २४ ऑगस्टपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 6:42 AM

Mhada Koknan Lottery: अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील. म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील ही घरे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता २३ ऑगस्टपासून सोडत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ २४ ऑगस्ट रोजी वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत होणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराची शुभ बातमी मिळावी या अनुषंगाने सदनिकांच्या वितरणाकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे.

अर्जदारांना सोडतीत सहभाग घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे क्रमप्राप्त राहील. अर्ज नोंदणीची सुरुवात २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ पासून होणार आहे. नोंदणीकृत अर्जदार २४ ऑगस्ट रोजीच दुपारी ३ पासून ऐच्छीक सदनिकेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करू शकतील. इच्छुक अर्जदार २२ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करू शकतील. अर्जदारांना २३ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अनामत रकमेच्या ऑनलाइन स्वीकृतीकरिता अंतिम दिनांक व वेळ २४ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ पर्यंत असणार आहे. ऑनलाइन बँकेत आरटीजीएस/एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा २४ सप्टेंबरच्या रात्री ११.५९ पर्यंत अर्जदारांना करता येणार आहे.

कुठे किती सदनिकाnप्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत ६ हजार १८० सदनिकाnअत्यल्प उत्पन्न गटासाठी शिरढोण (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ६२४ सदनिकाnखोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे ५८६ सदनिकाnसर्व्हे क्रमांक १६२ खोणी (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे २०१६ सदनिकाnसर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथे १७६९ सदनिकाnगोठेघर (जि. ठाणे) येथे ११८५ सदनिका

सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्नnअत्यल्प उत्पन्न गटासाठी २५ हजारnअल्प उत्पन्न गटासाठी २५,००१ ते ५० हजारnमध्यम उत्पन्न गटासाठी ५०,००१ ते ७५ हजारnउच्च उत्पन्न गटासाठी ७५ हजार रुपयांपेक्षा जास्तअर्जदारांकरिता https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सोडतीबाबत मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका उपलब्ध आहे.

अत्यल्प उत्पन्न गटमीरा रोड (ठाणे) १५ सदनिकाअल्प उत्पन्न गटnविरार बोळींज येथील १ हजार ७४२ सदनिकाnसर्व्हे क्रमांक १३ भंडारली (ता. जि. ठाणे) येथील ८८ सदनिकामध्यम उत्पन्न गटnविरार बोळींज येथे ३६ सदनिकाnवेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे २ सदनिकाnसर्व्हे क्रमांक २१६ पीटी, २२१ पीटी मीरा रोड (जि. ठाणे) येथे १९६ सदनिका

उच्च उत्पन्न गटसर्व्हे क्रमांक ४९१, २३ पार्ट वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथे १ सदनिका सोडतीत आहे.

टॅग्स :म्हाडा