म्हाडाचा बिल्डरला दणका; ७०० पक्की घरे पाडली!
By सचिन लुंगसे | Published: December 9, 2023 10:45 PM2023-12-09T22:45:33+5:302023-12-09T22:46:21+5:30
गेल्या दोनएक दिवसांपासून ही कारवाई सुरु असून, पक्की घरे पाडण्याचे काम सुरुच आहे.
मुंबई : म्हाडाच्या जमिनीवर अतिक्रमण करत खासगी बिल्डरने बांधलली सुमारे ७०० घरे प्राधिकरणाने पाडली आहेत. गेल्या दोनएक दिवसांपासून ही कारवाई सुरु असून, पक्की घरे पाडण्याचे काम सुरुच आहे.
म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, डी.एन.नगर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या जमिनीवरील संक्रमण शिबिरातील ७०० घरे तोडण्यात आली आहेत. गेल्या १० वर्षांपासून कोणताही हक्क नसताना म्हाडाच्या जमिनीवर ही बांधकामे करण्यात आली होती.
एका खासगी बिल्डरला २००२ मध्ये एका वर्षासाठी ही जागा देण्यात आली होती. मात्र संबंधिताने जागेचा गैरवापर केला. संक्रमण शिबिरासाठी ही जागा दिडएक वर्षाकरिता देण्यात आली असताना बिल्डरने शेकडो पक्के घरे संक्रमण शिबिरात बांधली होती. हे संक्रमण शिबीर अनधिकृत म्हाडाने कारवाई केली आहे.