Join us

म्हाडाचे घर साडेसात कोटींना; घरांच्या किमती ३० लाखांपासून; सर्वसामान्यांना कसे परवडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 10:36 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ४ हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असली तरी या घरांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वतीने ४ हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार असली तरी या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा आहेत. ताडदेव येथील उच्च उत्पन्न गटातील घराची किंमत तब्बल ७ कोटी ५७ लाख ९४ हजार २६८ आहे. घराची कमीत कमी किंमत ३० लाख ४४ हजार असून, ती गोरेगाव पहाडी येथे आहेत. येथील घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असून, त्यांची अनामत रक्कम २५ हजार ५९० रुपये आहे. 

सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता नियमावली, मार्गदर्शक सूचना, सदनिकांचे विवरण, पात्रतेचे निकष व आरक्षण प्रवर्ग यांबाबत माहिती पुस्तिकेत नमूद करण्यात आली आहे. पुस्तिका म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in  या संकेतस्थळावर क्विक लिंक या विंडोमध्ये इच्छुक अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. 

इच्छुक अर्जदारांनी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

येथे घेता येईल घर मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरीवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ४ हजार ८३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाली आहे. 

  कन्नमवार नगर दोन ठिकाणी प्रकल्प असून त्यातील घराची किंमत ३४ लाख ७४ हजार व ३६ लाख १६ हजार अशी आहे. 

टॅग्स :म्हाडा