Join us

म्हाडाच्या घरासाठी पैसे उकळणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2016 3:19 AM

म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे सात लाख रुपये उकळल्यानंतर आणखी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोन जणांना

मुंबई : म्हाडाच्या घराचे आमिष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे सात लाख रुपये उकळल्यानंतर आणखी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या दोन जणांना म्हाडा मुख्यालयाच्या परिसरात सुरक्षा आणि दक्षता विभागाने सापळा रचत रंगेहाथ पकडले. रत्नकांत जाधव आणि शाम अंकुश सातर्डेकर अशी या दोघांची नावे असून, त्यांच्याविरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सुरजकुमार दुबे यांनी याप्रकरणी म्हाडाकडे तक्रार दाखल केली होती. जाधव आणि सातर्डेकर यांनी दुबे यांना म्हाडाचे घर मिळवून देतो, असे सांगत सात लाख रुपये घेतले होते. शिवाय म्हाडाच्या घराचे देकारपत्रही दिले होते. घराचे ताबा पत्र देण्यासाठी त्यांनी दुबे यांच्याकडे आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली होती. देकारपत्राबाबत पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे आढळून आले.