Join us

म्हाडाचे घर आता तुमच्या बजेटमध्ये; कोकण लॉटरीत घरांच्या किमती कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 5:24 AM

शिरढोण, खोणी, गोठेघर, बोळींज येथे अत्यल्प गटासाठी घरे असून, या घरांच्या किंमती १४ लाखांपासून २१ लाखांवर आहेत.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळातर्फेही ५ हजार ३११ घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, मुंबई मंडळाच्या तुलनेत कोकण मंडळाची घरे स्वस्त आहेत. 

कोकण मंडळाच्या घराची कमीत कमी किंमत ९ लाख ८९ हजार ३०० रुपये असून, अत्यल्प गटातील ही घरे पालघरमधील गोखिवारे येथे आहेत, तर सर्वाधिक घराची किंमत ४१ लाख ८१ हजार ८३४ रुपये असून, मध्यम गटातील ही घरे विरार-बोळींज परिसरात आहेत. मध्यम गटासाठीची घरे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात असून, या घरांच्या किमती ३३ लाखांवर आहेत. विरार, बोळींज परिसरातील घरे अल्प आणि मध्यम गटासाठी असून, या घरांची किमती २३ लाखांपासून ४१ लाखांवर आहेत.

कुठे आहेत अत्यल्प गटाची घरे?शिरढोण, खोणी, गोठेघर, बोळींज येथे अत्यल्प गटासाठी घरे असून, या घरांच्या किंमती १४ लाखांपासून २१ लाखांवर आहेत. रायगडमधील खानावळे, तळेगाव आणि कल्याणमधील घरीवली येथे अत्यल्प गटासाठी असलेल्या घरांच्या किंमती १२ लाखांपासून १३ लाखांपर्यंत आहेत. ठाणे, कल्याण, पालघर जिल्ह्यात अल्प गटासाठी घरे असून, या घरांच्या किमती १२ लाखांपासून ३२ लाखांपर्यंत आहेत.

टॅग्स :म्हाडा