म्हाडाचे घर हवे की नको; १ सप्टेंबरपर्यंत कळवा, स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 06:19 AM2023-08-31T06:19:28+5:302023-08-31T06:19:35+5:30
१ सप्टेंबरपर्यंत अर्जदारांकडून प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर त्यांचा नकार ग्राह्य धरला जाईल आणि प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे.
मुंबई : म्हाडाच्या ४ हजार ८२ घरांच्या लॉटरीतील स्वीकृती पत्र सादर केलेले नाही, अशा १६९ यशस्वी अर्जदारांनी घर घेणार की नाही याबाबतचा निर्णय कळविण्याकरिता दोन दिवसांची अंतिम मुदत देण्यात येत आहे. १ सप्टेंबरपर्यंत अर्जदारांकडून प्रतिसाद प्राप्त झाला नाही तर त्यांचा नकार ग्राह्य धरला जाईल आणि प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे.
म्हाडा लॉटरीतील विजेत्यांना मिळालेली सदनिका ते घेत असल्याबाबतची स्वीकृती दर्शविण्याकरिता प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. ३४६२ अर्जदारांची स्वीकृती प्राप्त झाली आहे. घर घेणार की म्हाडाला परत करणार? यासाठी यशस्वी अर्जदारांना २७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र १६९ अर्जदारांनी कळविलेले नाही. अशांना मुदतवाढ देण्यात आली आहे.