म्हाडाच्या मास्टरलिस्टमध्ये झोलझाल, एका घराबदल्यात दोन घरे : संक्रमण शिबिरातील घरेही विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 02:53 IST2017-09-07T02:52:51+5:302017-09-07T02:53:04+5:30
म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीमधील पात्र रहिवाशांना एका घराच्या बदल्यात दोन घरे वाटल्याचा गंभीर आरोप ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशनने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

म्हाडाच्या मास्टरलिस्टमध्ये झोलझाल, एका घराबदल्यात दोन घरे : संक्रमण शिबिरातील घरेही विकली
मुंबई : म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीमधील पात्र रहिवाशांना एका घराच्या बदल्यात दोन घरे वाटल्याचा गंभीर आरोप ट्रान्झिस्ट कॅम्प असोसिएशनने बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. यामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा असोसिएशनचा आरोप आहे.
असोसिएशनचे अभिजित पेठे म्हणाले की, म्हाडाच्या मास्टरलिस्टमधील तीन रहिवाशांना एकूण ६ घरांचे वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे एका प्रकरणात ज्या महिलेच्या नावाने घर देण्यात आलेले आहे, ती महिला संबंधित सेस इमारतीत राहतच नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे म्हाडा अधिकाºयांच्या संगनमताने हा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. यासंदर्भात गेल्या तीन वर्षांतील मास्टरलिस्टअंतर्गत ताब्यात घेतलेल्या आणि वितरित केलेल्या घरांची माहिती मागितली असता, अशी माहितीच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे म्हाडाचे त्रयस्त यंत्रणेकडून लेखापरीक्षण करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे.