अबबबब... म्हाडाच्या 'या' फ्लॅटची किंमत वाचून 'फ्लॅट' व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 07:07 PM2018-11-03T19:07:45+5:302018-11-03T19:12:20+5:30

म्हाडाच्या १६ डिसेंबरला फुटणाऱ्या लॉटरीतील सर्वाधिक किंमतीची सदनिका धवलगिरी, कंबाला हिल, ग्रँट रोड इथे आहे.

mhada's most expensive and cheapest flat in mumbai | अबबबब... म्हाडाच्या 'या' फ्लॅटची किंमत वाचून 'फ्लॅट' व्हाल!

अबबबब... म्हाडाच्या 'या' फ्लॅटची किंमत वाचून 'फ्लॅट' व्हाल!

Next

म्हाडाची घरं म्हणजे स्वस्त घरं, हे समीकरण आता तितकंसं जुळत नाही, याची कल्पना गेल्या काही सोडतींमधून आली आहेच. यंदाच्या १३८४ घरांच्या लॉटरीत म्हाडाने किंमतीचं नवं धोरण ठरवून, परवडणाऱ्या किंमतीतील अधिक घरं देण्याचा प्रयत्न केला असला, तरी सर्वात महागड्या फ्लॅटची किंमत आपल्याला 'फ्लॅट' करणारीच आहे. 

म्हाडाच्या १६ डिसेंबरला फुटणाऱ्या लॉटरीतील सर्वाधिक किंमतीची सदनिका धवलगिरी, कंबाला हिल, ग्रँट रोड इथे आहे. तिची किंमत ५ कोटी ८० लाख रुपये असेल. या फ्लॅटची चावी कुणाला मिळते, याबद्दल नक्कीच उत्सुकता आहे. याआधी म्हाडाच्या लॉटरीतील कोटींच्या घरांना खरेदीदारच मिळाला नव्हता. यावेळी या फ्लॅटसाठी कुणी लक्ष्मीवंत पुढे येतो का, हे पाहावं लागेल. 

याउलट, म्हाडा लॉटरीतील सर्वात कमी किंमतीची सदनिका चांदिवली, पवई येथे आहे. तिची किंमत १४ लाख ६१ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.  

उत्पन्न गटानुसार वर्गीकरण (मासिक)

अत्यल्प उत्पन्न गटः २५ हजार रुपयांपर्यंत
अल्प उत्पन्न गटः २५,००१ रुपये ते ५०,००० रुपये
मध्यम उत्पन्न गटः ५०,००१ रुपये ते ७५,००० रुपये
उच्च उत्पन्न गटः ७५,००१ रुपये व त्यापेक्षा अधिक

उत्पन्न गटनिहाय उपलब्ध सदनिका 

अत्यल्प उत्पन्न गटः ६३ सदनिका
अल्प उत्पन्न गटः ९२६ सदनिका
मध्यम उत्पन्न गटः २०१ सदनिका
उच्च उत्पन्न गटः १९४ सदनिका

सदनिकांची विक्री किंमत

अत्यल्प उत्पन्न गटः २० लाख रु. वा त्यापेक्षा कमी
अल्प उत्पन्न गटः २० लाख ते ३५ लाख रुपयांपर्यंत
मध्यम उत्पन्न गटः ३५ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंत
उच्च उत्पन्न गटः ६० लाख व त्याहून अधिक

विविध प्रवर्गांसाठी आरक्षित सदनिका

अनुसूचित जाती नवबौद्धांसह - १५७ सदनिका
अनुसूचित जमाती - ८७ सदनिका
भटक्या जमाती - २२ सदनिका
विमुक्त जमाती - २१ सदनिका
पत्रकार - ३६ सदनिका
स्वातंत्र्यसैनिक - ३६ सदनिका
अंध व अपंग व्यक्ती - ४३ सदनिका
संरक्षण दल - २८ सदनिका
माजी सैनिक - ७० सदनिका
आजी-माजी आमदार / खासदार - २६
म्हाडा कर्मचारी - २८
राज्य शासनाचे कर्मचारी - ७०
केंद्र शासनाचे कर्मचारी - २८
कलाकार - २८
सर्वसामान्य जनता - ७०४

कुठे, किती घरं?

अॅन्टॉप हिल, वडाळा - २७८ सदनिका
प्रतीक्षानगर, सायन - ८९ सदनिका
गव्हाणपाडा, मुलुंड - २६९ सदनिका
पी. एम. जी. पी. मानखुर्द - ३१६ सदनिका
सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प) - २४ सदनिका
महावीरनगर, कांदिवली (प) - १७० सदनिका
तुंगा, पवई - १०१ सदनिका
मुं. इ. दु. व पु. मंडळामार्फत प्राप्त सदनिका - ५०
विकास नियंत्रण विनियम ३३ (५) अंतर्गत - १९ सदनिका
विखुरलेल्या सदनिका - ६८

म्हाडाच्या सोडतीचं वेळापत्रक

>> ५ नोव्हेंबर २०१८ - जाहिरात प्रसिद्धी आणि ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी सुरुवात

>> १० डिसेंबर २०१८ - अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

>> १६ डिसेंबर २०१८ - सोडतीचा दिनांक

Web Title: mhada's most expensive and cheapest flat in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा