म्हाडाची घरं म्हणजे स्वस्त घरं, हे समीकरण आता तितकंसं जुळत नाही, याची कल्पना गेल्या काही सोडतींमधून आली आहेच. यंदाच्या १३८४ घरांच्या लॉटरीत म्हाडाने किंमतीचं नवं धोरण ठरवून, परवडणाऱ्या किंमतीतील अधिक घरं देण्याचा प्रयत्न केला असला, तरी सर्वात महागड्या फ्लॅटची किंमत आपल्याला 'फ्लॅट' करणारीच आहे.
म्हाडाच्या १६ डिसेंबरला फुटणाऱ्या लॉटरीतील सर्वाधिक किंमतीची सदनिका धवलगिरी, कंबाला हिल, ग्रँट रोड इथे आहे. तिची किंमत ५ कोटी ८० लाख रुपये असेल. या फ्लॅटची चावी कुणाला मिळते, याबद्दल नक्कीच उत्सुकता आहे. याआधी म्हाडाच्या लॉटरीतील कोटींच्या घरांना खरेदीदारच मिळाला नव्हता. यावेळी या फ्लॅटसाठी कुणी लक्ष्मीवंत पुढे येतो का, हे पाहावं लागेल.
याउलट, म्हाडा लॉटरीतील सर्वात कमी किंमतीची सदनिका चांदिवली, पवई येथे आहे. तिची किंमत १४ लाख ६१ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
उत्पन्न गटानुसार वर्गीकरण (मासिक)
अत्यल्प उत्पन्न गटः २५ हजार रुपयांपर्यंतअल्प उत्पन्न गटः २५,००१ रुपये ते ५०,००० रुपयेमध्यम उत्पन्न गटः ५०,००१ रुपये ते ७५,००० रुपयेउच्च उत्पन्न गटः ७५,००१ रुपये व त्यापेक्षा अधिक
उत्पन्न गटनिहाय उपलब्ध सदनिका
अत्यल्प उत्पन्न गटः ६३ सदनिकाअल्प उत्पन्न गटः ९२६ सदनिकामध्यम उत्पन्न गटः २०१ सदनिकाउच्च उत्पन्न गटः १९४ सदनिका
सदनिकांची विक्री किंमत
अत्यल्प उत्पन्न गटः २० लाख रु. वा त्यापेक्षा कमीअल्प उत्पन्न गटः २० लाख ते ३५ लाख रुपयांपर्यंतमध्यम उत्पन्न गटः ३५ लाख ते ६० लाख रुपयांपर्यंतउच्च उत्पन्न गटः ६० लाख व त्याहून अधिक
विविध प्रवर्गांसाठी आरक्षित सदनिका
अनुसूचित जाती नवबौद्धांसह - १५७ सदनिकाअनुसूचित जमाती - ८७ सदनिकाभटक्या जमाती - २२ सदनिकाविमुक्त जमाती - २१ सदनिकापत्रकार - ३६ सदनिकास्वातंत्र्यसैनिक - ३६ सदनिकाअंध व अपंग व्यक्ती - ४३ सदनिकासंरक्षण दल - २८ सदनिकामाजी सैनिक - ७० सदनिकाआजी-माजी आमदार / खासदार - २६म्हाडा कर्मचारी - २८राज्य शासनाचे कर्मचारी - ७०केंद्र शासनाचे कर्मचारी - २८कलाकार - २८सर्वसामान्य जनता - ७०४
कुठे, किती घरं?
अॅन्टॉप हिल, वडाळा - २७८ सदनिकाप्रतीक्षानगर, सायन - ८९ सदनिकागव्हाणपाडा, मुलुंड - २६९ सदनिकापी. एम. जी. पी. मानखुर्द - ३१६ सदनिकासिद्धार्थ नगर, गोरेगाव (प) - २४ सदनिकामहावीरनगर, कांदिवली (प) - १७० सदनिकातुंगा, पवई - १०१ सदनिकामुं. इ. दु. व पु. मंडळामार्फत प्राप्त सदनिका - ५०विकास नियंत्रण विनियम ३३ (५) अंतर्गत - १९ सदनिकाविखुरलेल्या सदनिका - ६८
म्हाडाच्या सोडतीचं वेळापत्रक
>> ५ नोव्हेंबर २०१८ - जाहिरात प्रसिद्धी आणि ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी सुरुवात
>> १० डिसेंबर २०१८ - अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख
>> १६ डिसेंबर २०१८ - सोडतीचा दिनांक