मुंबई : म्हाडाचे घर मिळवून देतो अथवा लॉटरीत सेटिंग लावून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या दलालांचा पर्दाफाश करण्यासाठी म्हाडाकडून टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधून आपण फसवणूक रोखू शकता; अथवा त्या दलालाचे नाव जाहीर करू शकता, असे आवाहन म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केले आहे. ०२२-६६४०५४४५ या टोल फ्री क्रमांकाची सोय म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून करण्यात आली असून यावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता, असे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची तारीख जाहीर झाल्याने सध्या म्हाडाच्या कार्यालयात दलालांची गर्दी होऊ लागली आहे. लॉटरीतील घरांवर डल्ला मारता येईल का, याचा अंदाज काही दलाल घेत आहेत. लॉटरीत किती घरे आहेत, ती कुठे आहेत तसेच राखीव कोटा आहे का? आदी चौकशी त्यांनी सुरू केली आहे. म्हाडाच्या अधिकारी-कर्मचाºयांच्या दालनांबाहेर हे दलाल ठाण मांडून बसत असल्याचे चित्र सध्या म्हाडा कार्यालयात पाहायला मिळत आहे. यापूर्वीच्या काही लॉटरींत बनावट कागदपत्रे सादर करून दलालांनी घरे हडपल्याची उदाहरणे ताजी आहेत. म्हाडाचे घर मिळवून देतो, आॅनलाइन अर्ज कसा भरायचा असे दाखवताना अर्जात दलाल करत असलेली फेरफार आदी तक्रारी म्हाडाकडे येत आहेत.तातडीने होणार कारवाईटोल फ्री क्रमांकावर तक्रार आल्यानंतर म्हाडा तातडीने कारवाई करेल. दरम्यान, १६ डिसेंबरला लागणारा लॉटरीचा निकाल अर्जदारांना आॅनलाइन पद्धतीने सकाळी ७ वाजल्यापासूनच ग्राहकांना घरबसल्या पाहता येईल.
दलालांना रोखण्यासाठी म्हाडाची कडक पावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 2:03 AM