मुंबई : स्वत:चे हक्काचे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु प्रत्येकालाच ते परवडणारे नसते. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिक परवडणाऱ्या घरासाठी म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडाने या वेळी मुंबई मंडळात तब्बल १००० अल्प उत्पन्नातील घरे लॉटरीत आणण्याचे जाहीर केल्यापासून मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या लॉटरीची तारीख म्हाडाच्या ढिसाळ कारभारामुळे लांबणीवर पडणार आहे. ही सर्व १,००० घरे मुंबई मंडळातील आहेत.म्हाडाच्या मागच्या वर्षीच्या लॉटरीत एकूण ८१९ घरांचा समावेश करण्यात आला होता. या वर्षी ही संख्या वाढवून १,००० घरे करण्यात आली. यासाठी म्हाडातील उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बैठकाही सुरू होत्या. मात्र, अजूनही या लॉटरीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यापर्यंत जाहीर होणाºया लॉटरीला आणखी बराच विलंब लागणार आहे.सध्या म्हाडाच्या कोकण भागातील विरार-बोळींज भागातील ३,३०० घरांची लॉटरी काढण्याचेही म्हाडाने ठरविले आहे. कोकण मंडळातील लॉटरीची तयारी पूर्ण झाली असून, या लॉटरीची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि हेच मुंबई मंडळाच्या १,००० घरांची लॉटरी लांबणीवर पडण्याचे अजून एक प्रमुख कारण आहे. कोकण मंडळाच्या ३,३०० घरांची लॉटरी आणि मुंबई मंडळाची १,००० घरांची लॉटरी एकत्र आल्यास याचा फटका कोकण मंडळाच्या लॉटरीला बसण्याची शक्यता आहे.म्हाडाच्या लॉटरीसाठी नागरिकांना एक विशिष्ट रक्कम म्हाडाकडे अर्ज करताना भरावी लागते. या दोन्ही लॉटरी एकत्र केल्यास सर्वसामान्य नागरिकांची अडचण होऊ शकते. कारण दोन्ही ठिकाणी इच्छुकांना अनामत रक्कम भरणे शक्य होणार नाही. मुळात मुंबईतील घरांसाठी म्हाडाकडे अंदाजे २ ते ३ लाख अर्ज येत असतात आणि कोकण मंडळांची लॉटरी असली, तरी अंदाजे ५० हजारांपर्यंत अर्ज येत असतात. त्यामुळे दोन्ही लॉटरी एकत्र झाल्यास कोकण मंडळांकडे आपसूकच इच्छुकांचे अर्ज कमी प्रमाणात येतील, अशी भीती कोकण मंडळाला आहे. त्यामुळे कोकण मंडळाची लॉटरी आधी घेऊन मगच मुंबई मंडळाच्या लॉटरीची तारीख घ्यावी, अशी विनंती कोकण मंडळातील अधिकाºयांनी म्हाडाच्या उच्चपदस्थ अधिकाºयांना केली आहे. त्यामुळे कोकण मंडळांची लॉटरी जाहीर होऊन पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत मुंबई मंडळाच्या लॉटरीला ब्रेक लागणार आहे.>लवकरच तारीख जाहीर करणारम्हाडाचे सहमुख्य अधिकारी संजय भागवत यांनी मुंबई मंडळाच्या लांबणीवर पडणाºया लॉटरीवर बोलताना सांगितले की, म्हाडा लवकरात लवकर तारीख जाहीर करण्याचा प्रयत्न करेल. कोकण मंडळाबरोबरच मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, ही लॉटरी किती लवकर काढणार, याबाबत अजून स्पष्टता नसून मुंबईकरांना मात्र तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घ्यावी लागणार आहे.
म्हाडाची मुंबईतील लॉटरी लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:58 AM