एमएचटी-सीईटीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर; १३ ते २३ एप्रिलदरम्यान होणार परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 12:06 AM2019-12-05T00:06:37+5:302019-12-05T00:06:57+5:30
www.mahacet.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वेळापत्रक पाहाता येईल.
मुंबई : राज्य प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार इंजिनीअरिंग आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा १३ ते २३ एप्रिल, २०२० दरम्यान होणार आहे.
विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तारखांची पूर्वकल्पना येऊन परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या ८ व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या ६ अभ्यासक्रमांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाही पर्सेन्टाइल पद्धतीने निकाल घोषित करण्यात येणार असून, त्यासाठी परीक्षा आॅनलाइन पद्धतीनेच घेण्यात येईल.
सीईटी सेलने तीन व पाच वर्षीय विधि (लॉ), बीई/बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए/बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड या सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
या विविध सीईटींसाठी कोणत्या तारखेला अर्ज करायचे, त्याची सविस्तर माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेल्या वेळापत्रकात प्रसिद्ध करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी केले आहे.
पीसीएम आणि पीसीबी गटाच्या परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल दरम्यानच्या काळात होतील, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
www.mahacet.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वेळापत्रक पाहाता येईल. याशिवाय परीक्षेचा अर्ज कधी करावा, कसा करावा, हॉलतिकीट कधी डाऊनलोड करता येईल, निकाल कधी लागणार आदी सर्व माहितीही या संकेतस्थळावर मिळेल, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सीईटीचे नाव सीईटीची तारीख आॅनलाइन सीईटीसाठी अर्जासाठी शेवटची निकालाची तारीख
अर्ज करण्याची तारीख तारीख
एलएलबी ५ वर्षे १२/०४/२०२० २०/१/२०२० २०/३/२०२० २८/०४/२०२०
एलएलबी ३ वर्षे २८/०६/२०२० १९/०३/२०२० ०६/०५/२०२० १४/०७/२०२०
बीपीएड ११/०५/२०२० ०२/०३/२०२० ०३/०४/२०२० २८/०५/२०२०
बीएड / एमएड १२/०५/२०२० ११/०३/२०२० ०३/०४/२०२० २७/०५/२०२०
एमपीएड १४/०५/२०२० ०६/०३/२०२० ०७/०४/२०२० ३/०६/२०२०
(फिल्ड टेस्ट १५/०५ ते १६/०५ )
बीए /
बीएससी बीएड २०/०५/२०२० १३/०३/२०२० १३/०४/२०२० ०८/०६/२०२०
एमएड २६/०५/२०२० १७/०३/२०२० ०८/०४/२०२० ११/०६/२०२०
बीई / बीटेक, बी फार्म/ डिफार्म, कृषी- १३ एप्रिल ते १७ एप्रिल आणि २० एप्रिल ते २३ एप्रिल
एमबीए - १४ मार्च आणि १५ मार्च, २०२०
मास्टर इन कॉम्प्युटर अॅप्लिकेशन - २८ मार्च, २०२०
आर्किटेक्चर - १० मे, २०२०
बॅचलर आॅफ हॉटेल मॅनेजमेंट -
१० मे, २०२०
मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंट -
१६ मे, २०२०